‘दृश्यम 2’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 6 दिवसात कमावले ‘इतके’ कोटी

मुंबई | अभिनेता अजय देवगण आणि तब्बूचा प्रसिद्ध चित्रपट ‘दृश्यम-2’ ने शानदार ओपनिंग केलीये. 18 नोव्हेंबरला रिलीज झालेला हा चित्रपट सहाव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई करत आहे.

‘दृश्यम 2’ या चित्रपटाने अवघ्या 7 दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. दृश्यम 2 च्या नॉनस्टॉप कमाईचा वेग काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. त्यामुळे चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरल्याचं पहायला मिळतंय.

2022 या वर्षात 100 कोटींचा टप्पा पार करणारा हा पाचवा हिंदी चित्रपट ठरला आहे. इतकंच नव्हे तर दृश्यम 2 हा अजय देवगणच्या करिअरमध्ये 100 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट होणारा तेरावा चित्रपट आहे.

‘दृश्यम-2’चे दिग्दर्शन अभिषेक पाठकने केले असून, यात अजय देवगण विजयच्या भूमिकेत दिसत आहे. तर तब्बू मीरा देशमुखच्या भूमिकेत आहे.

पोलिस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या मुलाच्या संशयास्पद मृत्यूनंतर विजय आणि त्यांच्या कुटुंबाला आलेल्या अडचणींचा हा चित्रपट आहे.

दरम्यान, दृश्यम 2 ने 100 कोटींचा टप्पा सहजतेने पार केला. मात्र 25 नोव्हेंबरपासून वरुण धवन आणि क्रिती सनॉनचा ‘भेडिया’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुळे दृश्यम 2 च्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More