नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चालक विरहित मेट्रो सेवेचा शुभारंभ केला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदींनी या सेवेचं लोकार्पण केलं.
2025 पर्यंत देशातल्या 25 पेक्षा अधिक शहरांमध्ये मेट्रो सुरू होईल, असं मोदींनी चालकविरहित सेवेचं लोकार्पण केल्यानंतर म्हटलं आहे.
काही वर्षांपूर्वी संभ्रमाचं वातावरण होतं. भविष्याची तयारी नव्हती. त्यामुळे पायाभूत सुविधांची मागणी आणि प्रत्यक्षात उभारल्या जाणाऱ्या सुविधा यांच्यात मोठं अंतर होतं. शहरीकरणाला आव्हान मानून आपण त्याचं रुपांतर संधीत करायला हवं, असं मत मोदींनी व्यक्त केलं.
तीन वर्षांपूर्वी मजेंटा लाईनवर मेट्रो सेवा सुरू झाली. त्यानंतर आता याच मार्गावर चालकविरहित मेट्रो सेवा सुरू होत आहे. भविष्यातील गरजांचा विचार करून देश पुढे जात आहे, असं मोदींनी म्हटलंय.
थोडक्यात बातम्या-
‘चोरी केली तर हिशोब द्यावाच लागेल’; किरीट सोमय्यांचं राऊतांवर टीकास्त्र
ईडीची कारवाई राजकीय हेतूने, आम्ही कुणालाही घाबरत नाही- आदित्य ठाकरे
पुणे भाजपचा ‘हा’ बडा नगरसेवक अजित पवारांना भेटला; चर्चांना जोरदार उधाण!
“ईडीची नोटीस येणं स्वस्त झालंय, आजकाल कुणालाही नोटीस बजावल्या जातात”
कालपासून ईडीचं कोणी आलं नाही, माझा माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय- संजय राऊत