Sant Tukaram Palkhi | यंदाच्या पंढरपूर वारीदरम्यान संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Palkhi) यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, पुणे पोलिसांनी एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. २० जून ते २३ जून २०२५ या कालावधीत पुणे शहरात ड्रोन कॅमेऱ्यांच्या (Drone Ban) वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
या बंदीमागे मुख्य कारण म्हणजे गर्दीचा गैरफायदा घेऊन अनुचित प्रकार घडू नयेत आणि सुरक्षा व्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.
ड्रोन बंदीमागचे कारण काय? :
पालखी सोहळ्यादरम्यान फोटोग्राफर आणि मीडिया प्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर हवाई छायाचित्रणासाठी ड्रोनचा वापर करतात. मात्र, यातून अनधिकृत चित्रीकरण, संवेदनशील भागांचा व्हिडिओ किंवा गोपनीयतेचा भंग होण्याचा धोका असतो. त्याचबरोबर, गर्दीत ड्रोन अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रतिबंधक आदेश लागू केला आहे.
या बंदी आदेशातून फक्त पुणे पोलिसांच्या अधिकृत हवाई पाळणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रोनना आणि विशेष शाखेच्या परवानगीनुसार काम करणाऱ्या संस्थांनाच परवानगी देण्यात आली आहे. इतर कोणालाही ड्रोन वापरायचा असल्यास, त्यांना पूर्वलिखित परवानगी घेणे बंधनकारक असेल. (Sant Tukaram Palkhi)
Sant Tukaram Palkhi | उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई :
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
पुणे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी ड्रोन बंदीचा आदर करून प्रशासनास सहकार्य करावे आणि पालखी सोहळा शांततेत पार पडण्यास मदत करावी. (Sant Tukaram Palkhi)