दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, कॉपी कराल तर…

10th Exam Paper Leak

Maharashtra Board Exams l येत्या काही दिवसांतच महाराष्ट्रातील इयत्ता 10 वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा (Board Exams) सुरू होणार आहेत. या परीक्षांदरम्यान होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, यंदापासून परीक्षा कॉपीमुक्त (Copy Free) करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

तंत्रज्ञानाचा वापर:

परीक्षा केंद्रांवर पूर्णपणे निगराणी (Surveillance) ठेवण्यासाठी आता वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा (Technology) वापर करण्यात येणार आहे. यामध्ये ड्रोन कॅमेरे (Drone Cameras), व्हिडिओ चित्रीकरण (Video Recording), भरारी पथक (Flying Squads) आणि फेशियल रेकग्निशन सिस्टीमचा (Facial Recognition System) समावेश असणार आहे. ज्यामुळे परीक्षा 100% कॉपीमुक्त आणि पारदर्शक (Transparent) होण्यास मदत होईल.

परीक्षांच्या तारखा:

12वी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र): 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025
10वी (माध्यमिक शालांत प्रमाणपत्र): 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025

Maharashtra Board Exams l निकोप वातावरणासाठी उपाययोजना:

यावर्षी परीक्षा शांत, भयमुक्त आणि निकोप वातावरणात पार पडाव्यात यासाठी राज्य सरकारने ‘यशस्वी कॉपीमुक्त अभियान’ (Successful Copy-Free Campaign) योजले आहे. शिक्षणमंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

हे’ आहेत महत्वाचे निर्णय

-परीक्षा केंद्रांच्या आसपास ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवले जाईल.
-परीक्षा सुरू होण्याच्या एक दिवस आधी परीक्षा केंद्रावरील आवश्यक भौतिक सुविधांची तपासणी केली जाईल.
-भरारी पथके आणि बैठी पथके (Sitting Squads) यांची व्यवस्था करण्यात येईल.
-परीक्षा केंद्राच्या बाहेर व्हिडिओ चित्रीकरण केले जाईल.
-फेशियल रेकग्निशन सिस्टीमचा वापर केला जाईल.

प्रत्येक परीक्षा केंद्रावर उपस्थित असलेल्या केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित व्यक्तींची तपासणी केली जाईल. या उपाययोजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सरकारने यावर्षीच्या परीक्षेला 100% कॉपीमुक्त आणि पारदर्शक बनवण्याचा निर्धार केला आहे.

News title : Drone Cameras, Video Recording and Facial Recognition to Ensure Copy-Free Exams

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .