बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“त्यांना अटक करू नये, त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवावं”

नवी दिल्ली | गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड मधील अनेक ड्रग्ज प्रकरण बाहेर येत आहेत. काही अभिनेते आणि अभिनेत्रींवर कारवाई देखील करण्यात येत आहे. त्यातच आता भारतीय चित्रपट सृष्टीत सर्वाधिक ड्रग्ज विकले जातात, असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी अमली पदार्थांबाबत भाष्य केलं आहे.

भारतीय उद्योगात सर्वाधिक ड्रग्ज विकले जातात. त्यामुळे भारतीय चित्रपट सृष्टीला तातडीने स्वच्छ करण्याची गरज आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. तसेच अमली पदार्थांचा वापर करणाऱ्यांना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्यात यावे आणि त्यांना अटक करण्यात येऊ नये किंवा तुरूंगात टाकू नये, असंही रामदास आठवले म्हणाले आहेत.

जे दारू पितात किंवा सिगारेट ओढतात त्यांना तुरूंगात पाठवले जात नाही. परंतु ज्यांच्याकडे अमली पदार्थांचे प्रमाण कितीही असले तरी त्यांना तुरूंगात टाकले जाते. हे बदलण्याची गरज आहे. जे व्यसनी आहेत किंवा ड्रग्ज वापरतात. त्यांना चांगल्या आरोग्य सेवेसाठी पुर्नवसन केंद्र किंवा व्यसनमुक्ती केंद्रात पाठवायला हवे, असं रामदास आठवले यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, रामदास आठवले यांनी दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत याचं उदाहरण दिलं आहे. सुशांतसिंग आत्महत्येनंतर चित्रपटसृष्टीतील अमली पदार्थांच्या मोठ्या प्रमाणात घटना समोर येत आहेत. आर्यन खानवरील कारवाईमध्ये बिलकूल पक्षपातीपणा नसून त्याच्या विरोधात एनसीबीकडे भक्कम पुरावे असल्यानेच न्यायालय जामीन देत नसावे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! ड्रग्स प्रकरणात पहिला जामीन मंजूर; आर्यन खानला सुट्टी नाहीच

“नरेंद्र मोदींच्या नावावर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या”

बँकेची कामं आटोपून घ्या! पुढील महिन्यात बँका 17 दिवस बंद

“त्यांच्या सांगण्यावरून मलिक आरोप करतायेत, पुरावे असतील तर न्यायालयात जा”

“बिडीची जेवढी किंमत महाराष्ट्रात आहे तेवढी सुद्धा ईडीची राहिली नाही”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More