बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

औषधांचा काळाबाजार करणार्‍यांना भर रस्त्यात चोपलं पाहिजे- रितेश देशमुख

मुंबई | कोरोना संकटाच्या काळात माणसांची दोन रूपं आपल्याला दिसून आलीत. यामध्ये काहींच्या कृतीतून माणुसकीचं दर्शन झालं तर काहींनी मयताच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, असं अनेक घटनांमधून समोर आलंं. सध्या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. तर रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्यामुळे या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत.

कोरोना संकटाच्या काळात औषधांच्या होणाऱ्या काळाबाजारवरून प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखने संताप व्यक्त केला आहे. औषधांचा काळाबाजार करणार्‍यांना भर रस्त्यात चोपलं पाहिजे, असं रितेश देशमुखने म्हटलं आहे. यासंदर्भात त्याने ट्विट केलं आहे.

नागपुरमध्ये एका कोरोना रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शनऐवजी अॅसिडिटीचे इंजेक्शन देण्यात आलं होतं. नागपुरातील जामठा परिसरातील ‘कोविडालय’ नावाच्या रुग्णालयात दिनेश गायकवाड नावाच्या पुरुष नर्सला आयसीयूमध्ये दाखल असलेल्या आणि अत्यवस्थ असलेल्या एका रुग्णाला लावण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने तीन रेमडेसिवीर इंजेक्शन दिले होते.

दरम्यान, दिनेश गायकवाड म्हणजेच आरोपी पुरुष नर्सने तीनपैकी दोन रेमडेसिवीर इंजेक्शन आपल्याकडे ठेवले आणि त्याऐवजी अत्यवस्थ रुग्णाला चक्क अॅसिडिटीचे इंजेक्शन टोचले. त्यानंतर रुग्णालयातील रेकॉर्डवर संबंधित रुग्णाला विशिष्ट कालावधीत तीन रेमडेसिवीर इंजेक्शन टोचल्याची नोंद केली. या घटनेवरून रितेशने संताप व्यक्त केला आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

ऑनलाईन संवाद साधताना लॉकडाऊन शब्दच विसरले मुख्यमंत्री, व्हिडीओ व्हायरल

आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज आक्रमक; 16 मे पासून मोर्चा काढणार

देशाला नव्या पंतप्रधानांची गरज- स्वरा भास्कर

क्रिकेट विश्वावर शोककळा! या भारतीय क्रिकेटपटूच्या आईपाठोपाठ बहिणीचाही झाला कोरोनाने मृ्त्यु

‘या’ ठिकाणी लॉकडाउन करा; मुंबई हायकोर्टाची उद्धव ठाकरेंना सूचना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More