Top News देश

सुपर कम्प्युटरची कमाल; कोरोनाच्या औषधाचा ‘क्लू’ दिला!

मुंबई |  जगातील सर्वात वेगवान संगणक असलेल्या समिटच्या मदतीने अमेरिकेतील वैज्ञानिकांनी कोरोना व्हायरसवर योग्य उपचार करुन बचाव करणारे औषध शोधले आहे. या शास्त्रज्ञांना 77 औषधांची ओळख पटली आहे, जे कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखू शकतात.

या 77 औषधांपासून वॅक्सीन बनविण्यास मदत मिळू शकते. वैज्ञानिकांनी 8 हजारपेक्षा जास्त औषधांची टेस्ट केल्यानंतर या औषधांची ओळख पटली आहे. ज्यामधून व्हायरसचा संसर्ग मानव जातीपासून फैलाव होण्यास थांबवण्यात येईल.

कोरोनाच्या लढाईत जगभरातील वैज्ञानिक कामाला लागले आहेत. मात्र, अद्यापही कोरोनावर ठोस उपाय किंवा औषध निर्माण झाले नाही. चीनच्या वुहान शहरातून पसरलेला कोरोना आज जगभरातील काना-कोपऱ्यात पसरला आहे. आता, या व्हायरसला थांबविणारे औषध लवकरच निर्माण होणार असल्याचं सांगण्यात येतंय.

दरम्यान, दिवसेंदिवस कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. आज महाराष्ट्रातला कोरोनाबाधितांचा आकडा हा 52 वर जाऊन पोहचला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली ‘ही’ विनंती

जनतेच्या पैशाने तीस लाख रुपयांची गाडी मी घेणार नाही- बबनराव लोणीकर

महत्वाच्या बातम्या-

हॉटेल-मेस बंद असल्याने विद्यार्थी चिंतेत; युवक काँग्रेसच्या ‘पार्सल’ने टेन्शन दूर!

कोरोनाची लागण झाली कनिकाला, अन् चिंतेत पडली संसद

“कोणाच्या बापात महाराष्ट्र सरकार पाडायची हिम्मत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या