बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ड्रग्ज हे जीवनाश्यक, ड्रग्जचा वापर करण्यास परवानगी दिली पाहिजे”

नवी दिल्ली | आर्यन खानला एनसीबीने अटक केल्यानंतर संपूर्ण देशभरात ड्रग्स प्रकरण गाजत आहे. त्यामुळे सध्या या प्रकरणावरून देशभरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसून येत आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज आर्यन खानच्या जामिनाबाबात आज सुनावणी झाली. त्यानंतर आर्यनला अखेर जामीन मिळाला आहे. अशातच एका काॅंग्रेसचे खासदारने वादग्रस्त वक्तव्य केटीएस तुलसी केलं आहे.

ड्रग्ज हे जीवनाश्यक असून त्याचा वापर केल्यामुळे आपल्या जीवनातील वेदना कमी होतात. त्याचा समतोल वापर केला पाहिजे. गुटखा-दारू, सिगारेट यांच्यासारखी ड्रग्सनाही सूट देण्यात यावी. दारू, गुटखा, तंबाखूमुळेही हानी होते. मात्र यांच्यावर कर भरून त्याचे सेवन करू दिले जाते. मग ड्रग्ज का नाही? करवसूली झाल्यानंतर ड्रग्जचा वापर करण्यास परवानगी दिली पाहिजे, असं गजब वक्तव्य केटीएस तुलसी यांनी केलं आहे.

अनेक प्रसंगी ड्रग्सच्या माध्यामातून औषधी घ्यावी लागतात, त्यामुळे ड्रग्जच्या वापरास परवानगी का देऊ नये? त्यासाठी एनडीपीएस कायदा 1985 मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. कारण त्याचा वापर लोकांना त्रास देण्यासाठी होत असतो. एनडीपीएस कायद्याचा वारंवार गैरवापर लोकांना अमली पदार्थाच्या जास्त किंवा वापराबाबत त्रास देण्यासाठी केला जात असल्याचंही केटीएस तुलसी म्हणाले.

दरम्यान, केटीएस तुलसी हे देशातील कायदेतज्ज्ञ आणि काॅंग्रेसचे खासदार आहेत. मागील वर्षी त्यांनी आपल्या कुटुंबासह पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. यादरम्यान त्यांच्यात बराच वेळ संवाद झाला होता.

थोडक्यात बातम्या-

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! MPSCची ‘इतक्या’ जागांसाठी जम्बो पदभरती

मी भाजप पुरस्कृत असतो तर… – खासदार संभाजीराजे

“भाजप आता गुन्हेगारांच्या जोरावर निवडणूक लढवणार का?”

“आज बाळासाहेब नाही पण तुम्ही आहात…”, क्रांती रेडकरचं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

फोन रेकाॅर्ड तपासा, मंत्र्यांची नावं समोर येतील; किरण गोसावीचा खळबळजनक आरोप, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More