बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ड्रग्ज अल्प प्रमाणात बाळगल्यास तो गुन्हा मानला जाणार नाही”

मुंबई | सध्या देशभरात ड्रग्ज प्रकरण (Drugs Case) चांगलंच गाजत आहे. काही मागील काळात एनसीबीकडून अनेक ठिकाणी छापा टाकत ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले. ड्रग्ज प्रकरणी अनेकांवर कारवाई करण्यात आली. अनेक मोठमोठ्या लोकांना अटक करण्यात आली. त्यामुळे आता अनेक ठिकाणावरुन ड्रग्ज जप्त करण्यात येत असलेलं चित्र पहायला मिळतंय.

ड्रग्ज प्रकरणात आता केंद्रीय संसदेच्या हिवाळी अधिवेशनात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे. 29 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या हिवाळी संसदीय अधिवेशनात (Winter Parlimentary session) याविषयी विधेयक मांडणार आहे.

नार्कोटिक्स ड्रग्ज बिल, 2021 या विधेयकाचाही समावेश असणार आहे . त्याअंतर्गत गांजा, भांग यासह अमली पदार्थ अल्प प्रमाणात बाळगणे हा गुन्हा मानला जाणार नाही, अशी तरतूद करण्यात येणार आहे. यामुळे अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या लोकांना सुधारण्याची संधी मिळू शकेल, असं सरकारला वाटतं. म्हणून हे विधायक हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.

दरम्यान, आर्यन खानला (Aryan Khan) अटक करण्यात आल्यावर ड्रग्ज प्रकरण आणखीनच प्रकाश झोतात आलं. अनेक खुलासे झाले, अनेक गोष्टी समोर आल्या. त्यामुळे अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या लोकांसाठी ही मागणी जोर धरु लागली होती.

थोडक्यात बातम्या – 

कोरोनानं टेंशन वाढवलं; WHO कडून ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

वादग्रस्त कृषी कायदे रद्द होणार?, आज होणार अंतिम निर्णय

‘अर्ध्यावरती डाव मोडला, अधूरी ड्रग्जची कहाणी’, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज तोडगा निघणार?, 11 वाजता होणार महत्त्वाची बैठक

नवाब मलिकांच्या अडचणींत वाढ; ‘त्या’ चॅटवरुन क्रांती रेडकरची पोलिसात धाव

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More