बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई विमानतळावरील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; तब्बल ‘इतक्या’ कोटींचं ड्रग्ज जप्त

मुंबई | काही महिन्यांपूर्वी देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी ड्रग्ज तस्करी (Drugs) गुजरातमध्ये (Gujrat) पकडण्यात आली होती. त्यानंतर ड्रग्जची अनेक प्रकरणं समोर येण्यास सुरूवात झाली आहे. अशातच आता देशासह राज्याला हादरवून टाकणारी घटना मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर (CSMT) घडली आहे. आतापर्यंतची राज्यातील सर्वात मोठी ड्रग्ज कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिटनं (AIU) कारवाई केली आहे. आपल्या मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केल्याचं युनिटच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. दोन परदेशी नागरिकांकडे तब्बल 247 कोटी रूपयांचं ड्रग्ज सापडल्यानं सर्वत्र खळबळ माजली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास यंत्रणांमार्फत चालू आहे.

झिम्बाबेचे नागरिक असेलेले दोन व्यक्ती पार्टीसाठी ड्रग्ज सप्लाय करण्यासाठी भारतात आले होते. त्यांच्याकडून तब्बल 35 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. हे ड्रग्ज चोर वेगवेगळ्या बॅगेतून नेण्यात येत होतं. अटक केलेल्या व्यक्तींमध्ये 46 वर्षीय पुरूष आणि 27 वर्षीय महिलेचा समावेश आहे. या प्रकरणानं सध्या मुंबईमध्ये तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

दरम्यान, गत काही महिन्यांपासून आपल्या देशात मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी करण्यात येत आहे. गेल्या महिन्यामध्ये मुंबईमध्ये घडलेलं बहूचर्चीत आर्यन खान ड्रग्ज प्रकरण कोणीही विसरू शकत नाही. अशातच आता हे प्रकरण घडल्यानं सर्वत्र पुन्हा ड्रग्जची चर्चा सुरू झाली आहे.

थोडक्यात बातम्या 

OBC Reservation: ओबीसी आरक्षणासाठी ठाकरे सरकारनं उचललं ‘हे’ मोठं पाऊल

…म्हणून शिवसेनेला अधूनमधून शेण खायला संज्या लागतो – निलेश राणे

शुभमंगल सावधान! अखेर विकी-कतरिना अडकले लग्नबंधनात

“शरद पवारांचं ठरलंय, 2024 मध्येही उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री करायचंय”

शेतकरी आंदोलन अखेर मागे! मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या पाच मागण्या मान्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More