बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अर्ध्यावरती डाव मोडला, अधूरी ड्रग्जची कहाणी’, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणापासून (aryan khan drugs case) राज्यात ड्रग्ज विरोधी कारवाईंना वेग आला आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी ड्रग्ज विरोधात विविध विभागांनी छापे टाकत कारवाईचा बडगा उचलला असल्याचं चित्र दिसत असताना आता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त (drugs seized) करण्यात आले आहेत. मुंबई विमानतळावरील कस्टम विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (mumbai airport) कस्टम विभागाने 4 किलो हेरोईन ड्रग्ज जप्त केले आहे. कस्टम विभागाने मोठी कारवाई करत दोन परदेशी महिलांना देखील ताब्यात घेतलं आहे. अटक करण्यात आलेल्या दोन महिलांकडून कस्टम विभागाने 4 किलो हेरोईन जप्त केलं, ज्याची किंमत ही तब्बल 20 कोटी रूपयांच्या आसपास आहे.

अटक करण्यात आलेल्या दोन महिलांकडे युगांडाचा पासपोर्ट आढळला आहे. क्यांगेरा फातुमा आणि मान्सिम्बे जयानाह या मायलेकींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या दोघी सूडान ते दुबई असा प्रवास करून दुबईहून मुंबई (mumbai) येथे आल्या असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे. कस्टम विभागाच्या कारवाईनंतर न्यायालयानेही या विदेशी महिलांना शिक्षा सुनावली आहे.

कस्टम विभागाने अटकेची कारवाई केल्यानंतर या दोन महिलांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. या दोन्ही आरोपी महिलांना ड्रग्ज प्रकरणी (drugs case) न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय सुनावला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नांदेड येथे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. तर दोन दिवसांपूर्वी अंबरनाथ येथील महिलेकडून 5 किलो गांजा जप्त करण्यात आला होता.

थोडक्यात बातम्या-

इंधन दर स्वस्त करण्यासाठी ‘हा’ आहे मोदी सरकारचा ‘मास्टर प्लान’

राज्य सरकारने दिलेली ‘ही’ ऑफर एसटी कर्मचारी मान्य करणार का?

…म्हणून ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमनं मागितली नारायण राणेंची माफी

तळीरामांची चिंता वाढली, दारू विकत घ्यायची असल्यास आता…

महाविकास आघाडीत नाराजीचा सुर; शिवसेना मंत्र्याचे राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More