पोलीस उपनिरीक्षकाकडून पत्नीचा भररस्त्यात छळ, व्हिडीओ व्हायरल

Drunk Police Sub-Inspector Harasses Wife in Public Viral Videos

Viral Videos | पोलिसांचे कर्तव्य कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे रोखणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षितता निर्माण करणे हे असते. महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस अधिकारी देखील तैनात असतात. परंतु, रक्षकांनीच त्रास दिल्यास दाद कोणाकडे मागायची? असा प्रश्न उपस्थित करणारी एक घटना समोर आली आहे. (Viral Videos )

भररस्त्यात पत्नीचा छळ

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पोलीस उपनिरीक्षक (Police Sub-Inspector) त्याच्याच पत्नीचा भररस्त्यात छळ करताना दिसत आहे. पोलिसांचा गणवेश घातलेला हा मद्यधुंद पुरुष एका महिलेला त्रास देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पुरुष उपनिरीक्षक असून पीडित महिला त्याची पत्नी आहे. या घृणास्पद कृत्यामुळे पोलीस विभागाने उपनिरीक्षकाला तात्काळ निलंबित केले आहे.

ही घटना उत्तर प्रदेशातील कासगंज (Kasganj) येथे घडली. हा उपनिरीक्षक कासगंज पोलिसात कार्यरत आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

व्हिडिओमध्ये काय आहे?

व्हिडिओमध्ये उपनिरीक्षक त्याच्या पत्नीला तिच्या संमतीशिवाय स्पर्श करताना आणि तिला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. बसस्टॉपवर (Bus Stop) घडलेली ही घटना पाहून त्याची पत्नी अस्वस्थ आणि घाबरलेली दिसत आहे. व्हिडीओ काढला जात असल्याचे लक्षात येऊनही तो थांबत नाही. तो नशेत धुंद असल्याचेही व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. (Viral Videos )

व्हिडिओ व्हायरल, पोलिसांवर टीका

हा व्हिडिओ एका एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, “युपी पोलिस हे खरे आहे का?” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. या व्हिडिओमुळे पोलिसांच्या प्रतिमेला धक्का बसला असून, लोकांकडून तीव्र टीका होत आहे.

Title : Drunk Police Sub-Inspector Harasses Wife in Public Viral Videos

 

 

 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .