हायकोर्टाकडून डीएसकेंना भीक मागण्याचा सल्ला

मुंबई | डीएसकेंच्या सततच्या कारणांना वैतागलेल्या हायकोर्टाने अखेर डीएसकेंना चक्क भीक मागण्याचा सल्ला दिलाय. पैसे उसने घ्या, भीक मागा, काहीही करा, लोकांचे पैसे कधी परत करणार याची माहिती द्या, अशा शब्दात मुंबई हायकोर्टाने डीएसकेंना सुनावलं आहे. 

7 ते 11 फेब्रुवारी दरम्यान तपास अधिकाऱ्यांपुढे हजर राहण्याचे आदेश डीएसकेंना देण्यात आले आहेत. डीएसकेंवर एमपीआयडी अंतर्गत काय कारवाई केली जाऊ शकते, याचा तपशील सादर करण्याचे आदेश कोर्टाने सरकारला दिलेत. तसेच डीएसकेंची कधीच कस्टडी न मागितल्यानं सरकारला चांगलंच सुनावलं देखील आहे. 

दरम्यान, 13 फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीत डीएसकेंना पत्नी हेमांगीसह हायकोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.