डीएसकेंनी कोर्टाला फसवलं?, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

मुंबई | पुण्याचे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णीना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.  मुंंबई उच्च न्यायालयाने कुलकर्णींचं अटकेपासूनचं संरक्षण काढून घेत त्यांचा पासपोर्ट देखील जप्त करण्याचे आदेश दिलेत.

न्यायालयाने 22 फेब्रुवारीपर्यंत अटकपूर्व जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. मात्र बुलडाणा अर्बन बँक ज्या मालमत्तेवर डी. एस. कुलकर्णींना कर्ज देणार होती ती मालमत्ता अाधीच दुसऱ्या बँकेकडं तारण असल्याचं समोर आलंय. 

न्यायालयाने याप्रकरणी तातडीने निर्णय घेत डी. एस. कुलकर्णीचं अटकेपासूनचं संरक्षण काढून घेतलंय. त्यामुळे पोलीस त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करत त्यांना कधीही अटक देखील करु शकतात.