मुंबई | झपाट्याने पसणाऱ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शहरी भागातल्या शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र ग्रामीण भागातील शाळा सुरूच राहणार आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका तसंच नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासजी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
सध्या शहरी भागात कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. त्या मानाने ग्रामीण भागात अजून कोरोनाचा शिरकाव झालेला नाहीये. याच पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातल्या शाळा सुरूच ठेवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. मात्र एकंदर या परिस्थितीचा दरदिवशी आढावा घेतला जाईल, असं शासनाने सांगितलं आहे.
पुढील आदेश येईपर्यंत तूर्तास 31 मार्चपर्यंत शाळा बंद राहतील, असं शासनाच्या वतीने स्पष्ट केलं गेलं आहे. तर दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळेनुसारच होतील, असं शासनाने सांगितलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“केंद्रात गो-गो म्हणून बघा कधी तुमचा खो-खो करतील तुम्हाला पण नाही समजणार”
“मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा कणा शाबूत असेल तर त्यांनी नितीन राऊतांच्या विरोधात कारवाई करून दाखवावी”
महत्वाच्या बातम्या-
“शेतात नांगर धरणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आज उपाध्यक्ष पदावर बसतोय याचा आनंद”
विदर्भात कोरोनाचा शिरकाव… यवतमाळमध्ये दोघांना कोरोनाची लागण
कोकणचा हापूसही सापडला कोरोनाच्या कचाट्यात; शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या
Comments are closed.