बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुळे यंदा जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द

पुणे | अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची 12 एप्रिलला सोमवती अमावस्या यात्रेला सुरुवात होणार होती. दरवर्षी अमावास्येला प्रारंभ होताच पालखी सोहळा निघत असतो आणि सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर भव्य यात्रा देखील भरत असते.

सध्या महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचं संकट असल्याने जेजुरी ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीमध्ये यात्रेनिमित्त महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षीही राज्यात कोरोनाचं संकट असल्याने या वर्षी होणारी सोमवती यात्रा व पालखी रद्द करण्याचा निर्णय खंडोबा देवस्थानच्या विश्वस्थ मंडळाने गावकर्‍यांशी चर्चा करून घेतला आहे.

या दरम्यान सोमवती अमावस्येनिमित्त करण्यात येणारे सर्व धार्मिक विधी केले जाणार असून भाविकांना दर्शन दिलं जाणार नसल्याचं मंदिर प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच जेजुरी गडावर भाविकांनी गर्दी करू नये असे आवाहनंही यावेळी करण्यात आलं आहे.

राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारने 30 एप्रिल पर्यंत वीकेंड लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. तसेच यात्रा व उत्सव साजरे करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर जेजुरीच्या खंडोबाची सोमवती अमावस्या निमित्त होणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीत एक मताने घेण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या –

रुग्णवाहिका नाही म्हणून चक्क कचऱ्याच्या गाडीतून नेला मृतदेह; ‘या’ जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

पोलीस अधिकारी असलेल्या मुलाचा मृतदेह पाहून आईनेही सोडले प्राण; बिहारमधील घटनेनं संपूर्ण देश हळहळला

‘समाजात गैरसमज पसरवणारी वक्तव्यं खपवून घेतली जाणार नाहीत’; जयंत पाटील आक्रमक

वाझेंच्या अडचणीत वाढ; टीआरपी घोटाळ्यात ‘इतक्या’ लाखांची लाच घेतल्याचा आरोप

पुण्याला PM केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर निघाले खराब; अधिकाऱ्याने अजित पवारांकडे केली तक्रार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More