बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पैशांच्या अडचणीमुळे वडिलांनी चक्क आपल्या मुलीलाच विकलं अन्…

देहरादून | उत्तराखंडमधील चमोलीमध्ये अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या जगभर कोरोनाचं संकट सुरू आहे. याच संकटाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊन घोषित करण्यात आला होता. यादरम्यान अनेकांना पैशांच्या अडचणींना सामोर जावं लागलं आहे. अशातच चमोली गावातील एका व्यक्तीला पैशांची गरज होती आणि त्यासाठी त्याने स्वतःच्याच मुलीला केवळ 6000 रुपयांसाठी विकलं असल्याचं उघड झालं आहे.

लाॅकडाऊननंतर यावर्षी फेब्रुवारीमध्ये शाळा सुरू झाल्या. उत्तराखंडच्या चामोली येथील एका शाळेत विद्यार्थिनी पोहोचली नाही म्हणून शिक्षकांनी तिला त्याबद्दल विचारलं. तेव्हा विद्यार्थिनीबाबत काहीच माहिती मिळाली नाही. त्यानंतर परीक्षा होणार होती म्हणून शिक्षक मुलीच्या घरी पोहोचले आणि त्यांनी विद्यार्थिनीला शाळेत पाठविण्यास सांगितले. मात्र त्यानंतरही ही विद्यार्थिनी आली नाही.

मुलीच्या घरी पोहोचल्यानंतर शिक्षकांना संशय आला. जेव्हा मुलीच्या वडिलांकडून चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांनी आपल्या 14 वर्षाच्या मुलीचे लग्न केल्याचे सांगितले. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याने आपल्या 14 वर्षांच्या मुलीचे लग्न 32 वर्षांच्या व्यक्तीशी लावून दिलं होतं.

दरम्यान, गावातल्या एका मध्यस्थीने मुलीच्या पालकांची फसवणूक करून त्यांची मुलगी 6 हजार रुपयांत विकण्यात आली होती . मुलीने सांगितल्याप्रमाणे तिचा पती दररोज मद्यपान करायचा आणि तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करायचा. होळीच्या दिवशी तिच्या पतीने जबर मारहाण केली आणि तिच्यावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न देखील केला. आता मुलगी परत तिच्या पतीकडे जाऊ इच्छित नाही, असे शिक्षक उपेंद्र यांनी सांगितले आहे.

थोडक्यात बातम्या-

पत्रकाराचं अपहरण करून निर्घृण हत्या; अहमदनगरच्या घटनेनं महाराष्ट्र हळहळला

धक्कायदायक! लॉकडाऊनचा नियम मोडल्यानं पोलिसांनी मारायला लावल्या 300 दंड बैठका; तरूणाचा जागीच मृत्यू

नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात वर्षा गायकवाड यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अमित शहा काय देशाचे मालक नाहीत; प्रकाश आंबेडकरांचा जोरदार टोला

5 वर्ष शिक्षक अल्पवयीन मुलीवर करायचा बलात्कार; निवृत्त झाल्यानंतर तिच्यासोबतच केलं असं काही…

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More