बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुरामुळे कोल्हापुरातील ‘हे’ महत्वाचे रस्ते बंद

कोल्हापूर | राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कुठं दरड कोसळली, तर कुठं पूराचं पाणी थेट घरांमध्ये घुसलं. त्यामुळे अनेक लोक बेघर झालेत. तसेच कोल्हापुरात देखील पूराच्या पाण्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. कारण अनेक महत्वाचे रस्ते पूराच्या पाण्यामुळे बंद करण्यात आले आहेत.

पुराचं पाणी राष्ट्रीय महामार्गावर आल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 शिरोली पुलाजवळ बंद करण्यात आला आहे कोल्हापुरातून हायवेला जाणारे सर्व रस्ते बंद झाले आहेत. पुरामुळे मुख्य मार्गच बंद करण्यात आल्यामुळे गाड्यांच्या मोठ्या रांगा लागल्याचं पहायला मिळालं.

अत्यावश्यक कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये. तसंच अत्यावश्यक कामाच्या वेळीही रस्त्याची पूर्ण माहिती असल्याशिवाय कुणीही रोडवर जाऊ नये, असं आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केलं आहे

रस्त्यांची माहिती घ्यावी, तसंच पोलीस प्रशासनामार्फत वाहतुकीच्या दृष्टीनं वरीलप्रमाणे रस्त्याची माहिती देण्यात येईल. तरी सर्व नागरिकांनी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावं, असंही त्यांनी म्हटलंय.

कोल्हापूर ते गारगोटी दुधगंगा कारखानाजवळ – बंद आहे
कोल्हापूर ते राधानगरी – बंद आहे
कोल्हापूर ते गगनबावडा (दोनवडे, कळे, मांडुकली) याठिकाणी बंद आहे
कोल्हापूर ते पन्हाळा, शाहूवाडी, आंबा – बंद आहे

कोल्हापूर ते रत्नागिरी – बंद आहे
कोल्हापूर ते पुणे – बंद आहे
कोल्हापूर ते सांगली – बंद आहे
कोल्हापूर ते बेळगाव – बंद आहे
कोल्हापूर ते सिंधुदुर्ग/गोवा – बंद आहे

थोडक्यात बातम्या-

पुन्हा कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्याने दाम्पत्याने उचललं धक्कादायक पाऊल!

सप्टेंबरपर्यंत लहान मुलांच्या लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता – डाॅ. रणदीप गुलेरिया

राज कुंद्रा प्रकरणी क्राईम ब्रांचच्या तपासात धक्कादायक माहिती समोर!

“हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बपेक्षा पेगॅसस वेगळं नाही, तिथे माणसं मेली, इथे स्वातंत्र्य मेलं”

काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना शक्य ती मदत करावी- नाना पटोले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More