बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठवाड्यात अतिवृष्टीनं हाहाकार! 436 नागरिकांचा मृत्यू; मुख्यमंत्री ठाकरे करणार पाहणी दौरा

मुंबई | राज्यात गुलाब चक्रीवादळाचा जोरदार फटका मराठवाड्याला बसला आहे. गुलाब चक्रीवादळाचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाल्याने मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडात आलेला घास हिरावून घेतला आहे. तसेच सोयाबीन, ऊस, कापुस आणि अन्य खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत मराठवाड्यातील नुकसानीची माहिती दिली आहे. मराठवाड्यात जवळपास 22 लाखांपेक्षा अधिक जमीन पावसामुळं उद्ध्वस्त झाली आहे. या अतिवृष्टीमध्ये 436 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच 196 नागरिकांना वीज पडल्यानं मृत्यू झाला आहे, अशी प्राथमिक माहिती वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

पावसानं राज्यातील शेती आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे. मराठवाड्यासह 10 पैकी 7 जिल्ह्यांत 180 टक्के पाऊस झाला आहे. 436 मृत्यूंमध्ये 6 जणांचे मृतदेह अद्याप सापडले नाहीत. तसेच 136 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती वडेट्टीवारांनी सांगितली आहे.

दरम्यान, राज्याने आतापर्यंत अनेक मदतीसाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. तसेच तौक्ते चक्रीवादळाची मदत अद्याप मिळालेली नाही. तसेच मराठवाड्यातील आपत्तीग्रस्त भागाचा दौरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत, असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून मला सांगण्यात आलं आहे, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

तुम्ही सावरकर यांच्यासारख्या लोकांचा इतिहास वाचाल तर… – राहुल गांधी

“हे तर ओल्या दुष्काळाचे संकेत, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा”

“…म्हणून महेंद्रसिंग धोनीला केलं भारतीय संघाचा मेन्टाॅर”

“आम्ही शेतकरी गेलो सरणावर अन् माझ्या सरणावरची फुले मंत्र्यांच्या अंगावर”

“शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचलं पाहिजे, रस्त्याच्याकडेला उभं राहून पाहणी करू नका”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More