बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाप रे! पावसाच्या भयंकर रूपाने वाहतुकीचा महाराष्ट्रातील हा पूल लोकांच्या डोळ्यासमोर गेला वाहून

बीड | राज्यात मान्सूनला सुरूवात झाली आहे. सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. पहिल्याच पावसाने मुंबईची तुंबई झालेली पाहायला मिळत आहे. त्यासोबतच बीड जिल्ह्यातही पावसाने थैमान घातलेलं पहायला मिळालं. पावसाच्या भयंकर रूपाने एक पूल वाहून गेला आहे.

बीड जिल्ह्यातील परळी-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गाच्या चालू कामात मोठी अडचण निर्माण झाली आहे. परळी शहराजवळील कन्हेरवाडी येथे पुलाचं काम सुरू आहे. त्यामुळे त्यासाठी तात्पुरता वाहतुकीसाठी पुल बनवला होता. मात्र पुराच्या पाण्याने वाहतुकीसाठी तात्पुरता तयार केलेला पूल वाहून गेला आहे.

नंदागौळ परिसरात ढगफुटी सारखाच पाऊस झाला. या पावसाचं पाणी घाटातून शेतकऱ्यांच्या शेतात नदीला आल्याने हा पूल वाहून गेल्याचं बोललं जात आहे. हा पूल वाहून गेल्यावर परळी-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावर जवळजवळ लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मोठा वाहतुक कोंडी झाली होती.

दरम्यान, या पावसाच्या पाण्यामुळे नंदागौळमधील शेतीचं फार नुकसान झालं असल्याची माहिती समजत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परळी आंबेजोगाई रस्त्याचे काम रखडलं आहे. यामुळे सामान्य नागरिकांनाही याचा फटका बसत आहे. राजकीय दुर्लक्षामुळे हा रस्ता पुर्ण होत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक आणणार- बाळासाहेब थोरात

घरात कोणाला कोरोना झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार ‘ही’ सुविधा

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा, ‘या’ पिकांना होणार मोठा फायदा!

“कोरोना आणि रामदेव बाबा सारखेच, कधीही येतो कधीही जातो”

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहरात कोरोना रूग्णसंख्येला उतरती कळा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More