पुणे महाराष्ट्र

पुणेकरांसाठी हाय अलर्ट, ‘या’ पुलावरुन प्रवास करणं टाळा!

पुणे |  खडकवासला भागातून प्रवास करणं टाळा आणि पात्रालगतच्या रहिवाशांनी अधिकची काळजी घ्यावी अशा सूचना पालिकेकडून देण्यात आल्या आहेत.

खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात 16 हजार 478 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलं असून यामुळे भिडे पूल आणि नदी पात्रातील रस्ता पाण्याखाली जाणार आहे. यामुळे नागरिकांनी या पुलावरून प्रवास करणं टाळावं अशा सूचना पालिकेने दिल्यात.

येत्या पाच दिवसात कोकण, गोवा आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून आलेली हवा घाट माथ्यावर एकञ आल्याने जोरदार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस झाला आहे. आता फक्त पाच जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने पुन्हा माञ जोरदार बँटिग सुरू केलीये.

महत्वाच्या बातम्या-

“टीकाकरांना जनताच उत्तर देईल, ठाकरे कुटुंबीयांच्या मागे महाराष्ट्र उभा आहे”

भाजपत गेलेल्यांची परत येण्याची इच्छा- जयंत पाटील

“अधिकारी बदल्यांच्या नावाखाली महाविकासआघाडीच्या मंत्र्यांनी प्रचंड पैसा गोळा केलाय, सीआयडी चौकशी करा”

राज्यातील जीम तातडीने सुरु करावेत, विरोधी पक्षनेत्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

‘या’ कामगारांना मिळणार आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य, सरकारचा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या