बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात रुग्णांना ठेवण्यासाठी जागा शिल्लक नाही; रुग्णांसाठी हाॅटेल्स घेतले भाड्याने

पुणे | महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच राज्य सरकारतर्फे लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. नागरिकांना वारंवार नियमांचं पालन करण्यास सांगूनही नियमांचं काटेकोर पालन होत नसल्याने सरकारतर्फे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या ही महाराष्ट्रात आहे. त्यामुळे ही चिंतेची बाब म्हणावी लागेल.

देशातील सर्वाधिक लोकसंख्या ही महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आहे. पुण्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालल्याचं दिसून येत आहे. पुण्यामध्ये सध्या रुग्णालयात जागा शिल्लक नसल्याने रुग्णालयाने तीन खाजगी हॉटेल कोरोना रुग्णांना ठेवण्यासाठी भाड्याने घेतल्याचं समोर आलं आहे.

गेल्या 15 दिवसांपासून पुणे शहरात दररोज जवळपास 4 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पुण्याच्या रुबी रुग्णालयाने बेडची कमतरता भासत असल्याने 3 खासगी हॉटेल्स भाड्याने घेऊन त्याठिकाणी 180 रुग्णांसाठी खाटा उपलब्ध करून देण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे. यावरून पुण्यातील कोरोनाची भीषणता किती आहे याचा अंदाज लावता येईल.

पुण्यामध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे कोरोना रोखण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले जात आहेत. परंतु, नागरिक बेजबाबदारपणे वागत असल्याने कोरोना आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश येत नाही. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये मिनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. सध्या पुण्यामध्ये 39 हजार 518 सक्रिय रुग्णसंख्या असून आतापर्यंत 5 हजार 411 रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

थोडक्यात बातम्या

ॲानलाईन शिक्षणासाठी मुलीला मोबाईल दिला, एकदा वडिलांनी मोबाईल तपासताच धक्कादायक बाब समोर

चारचाकीत एकटे असताना मास्क घालावं की नाही?, दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

‘बहिरा स्वतःच्या तालावर नाचे’; संजय निरूपम यांचा राज ठाकरेंना टोला

मास्क नाकावरुन घसरलं म्हणून पोलिसांनी भररस्त्यात तुडवलं, पाहा धक्कादायक व्हिडीओ

कोविशिल्डचा दुसरा डोस घेताना ‘इतक्या’ दिवसांचं अंतर ठेवा, स्वत: पुनावालांनी सांगितलं कारण…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More