बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

परप्रांतीय मजूर, कामगार विद्यार्थी तसंच पर्यटकांना आता आपल्या घरी जाता येणार; केंद्राचा मोठा निर्णय

नवी दिल्ली |  देशव्यापी लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अनेक मजूर कामगार अडकून पडले आहेत. अनेकांना आपापल्या घरी सुखरूप जाण्याची इच्छा होती पण लॉकडाऊनमुळे त्यांना प्रवासासाठी मज्जाव करण्यात आला होता. मात्र त्यांना आता केंद्र सरकारने दिलासा दिला आहे.

गृह मंत्रालयाने एक आदेश जारी करत लोकांना इतर राज्यांत पाठवताना गोंधळ होऊ नये म्हणून नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. तसंच संबंधितांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. ज्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली तरच त्यांना गावी जाण्यास परवानगी दिली जाणार आहे.

केंद्रिय गृहमंत्रालयाने यासाठी काही गाईडलाईन्स आखून दिल्या आहेत. या गाईडलाईन्स पुढीलप्रमाणे आहेत-

  1. परप्रांतीय मजूर, पर्यटक, तीर्थयात्री तसंच विद्यार्थी या सर्वांना अटी आणि शर्थींसह प्रवासाची परवानगी दिली जाणार आहे.
  2. ज्या दोन राज्यांमध्ये प्रवास करायचा आहे त्या दोन्ही राज्यांची परवानगी आवश्यक आहे.
  3. फक्त बसनेच वाहतूक करता येईल.
  4. प्रवास करणाऱ्या सगळ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक असेल. तसंच गावाकडे पोहचल्यानंतर त्यांनी 14 दिवसांचा क्वारंटाईन पिरियड पाळावा लागणार आहे. आरोग्य अधिकारी त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवतील. तसंच गरज पडली तर संस्थात्मक क्वारंटाईन देखील केलं जाईल.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन बांगड्यांचं दुकान उघडलं पाहिजे- निलेश राणे

अमेरिकेने भारताला सीरियासारखी वागणूक दिली, मोदी ट्रम्प गळाभेट व्यर्थ गेली- असदुद्दीन औवेसी

महत्वाच्या बातम्या-

इरफानसोबत शेवटचा सिनेमा करणाऱ्या ‘या’ तिघांच्या बोलक्या प्रतिक्रिया!

दोन वर्षांपूर्वी लिहिलेल्या त्या पत्रात इरफाननं व्यक्त केली होती मृत्यूची शक्यता!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More