सावधान!!!… तुमच्या भागातही आज पडू शकतो पाऊस

Rain-in-Maharashtra2
Photo- treakearth.com

मुंबई | अरबी समुद्रालगत कमी दाबाचा पट्टा तयार झाला अाहे. त्यामुळे राज्यात सगळीकडे ढगाळ वातावरण आहे. परिणामतः महाराष्ट्र, कोकण, गोवा येथे तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पुढील दोन दिवसांमध्ये परिस्थिती पूर्वपदावर येईल, असं पुणे वेधशाळेने सांगितलं आहे. मात्र आता पुढच्या आठवड्यातही राज्यात ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला अाहे. 

हवामान खात्याच्या या इशाऱ्यामुळे द्राक्ष, अांबा अाणि काजुचे उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहेत.