“महाराष्ट्रातील घाणेरड्या राजकारणामुळे मला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला”- संजय राठोड
पालघर | शिवसेनेचे माजी वनमंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव पुढे आल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. तसेच या सर्व प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारही मोठ्या प्रमाणात अडचणीत आल्याचं दिसून आलं. राजीनाम्यानंतर संजय राठोड आता समाज बांधणीसाठी झटत असल्याचं दिसून येत आहे.
आमदार संजय राठोड यांनी पालघर जिल्ह्यातल्या वसईतील देवीपाडा तांड्यावर जाऊन बंजारा समाजातील लोकांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन समाज बांधणीला सुरुवात केली. महाराष्ट्रातील घाणेरड्या राजकारणामुळे मला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला असं माजी वनमंत्री संजय राठोड यांनी वसईतील आयोजित एका कार्यक्रमात म्हटलं आहे.
अतिशय गरीब आणि हलाखीच्या परिस्थितीतून कष्ट करून मी मंत्री पदापर्यंत पोहोचलो, पण महाराष्ट्रातील अतिशय घाणेरड्या राजकारणामुळे मला माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला हे खूप दुर्दैवी आहे. असं मत संजय राठोड यांनी व्यक्त केलं. तसेच माझ्या संकटकाळात संपूर्ण बंजारा समाज माझ्या पाठीशी उभा राहिल्याने मला बळ मिळालं आणि पुन्हा लढण्याची जिद्द देखील मिळाली. आता मी समाजातील लोकांच्या दारात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं संजय राठोड यांनी सांगितलं.
पालघर जिल्ह्यातील वसई येथून समाज बांधणीला सुरुवात करण्याचं कारण सांगताना संजय राठोड यांनी म्हटलं की, महाराष्ट्रातील विविध भागातील समाज या परिसरात वसलेला आहे आणि ऐतिहासिक तसेच क्रांतिकारी इतिहासही वसईला लाभला असल्याने आणि मुंबईच्या जवळचं ठिकाण असल्याने मी हे ठिकाण निवडलं. कोरोनासारख्या महामारीत समाजासोबत राहून त्यांच्या अडचणी समजून घेणं हे माझं कर्तव्य असल्याचंही संजय राठोड यांनी यावेळी म्हटलं.
थोडक्यात बातम्या –
“फडणवीस आणि राज ठाकरेंच्या आश्वासनानंतरच राज्यात मिनी लाॅकडाऊन लागू”
सोन्याच्या किमतीत वाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर
‘ब्रेक दि चेन’ मोहीमेअंतर्गत महाराष्ट्र सरकारची नवी सुधारीत नियमावली जाहीर, वाचा सविस्तर
भुकंपाच्या झटक्यानं ‘ही’ चार राज्यं हादरली; पंतप्रधान मोदींनी घेतली फोनवरून माहिती
दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; जाणुन घ्या आकडेवारी
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.