बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पावसामुळं गंगेच्या पाणी पातळीत वाढ; किनारी वाळूत दफन केलेले मृतदेह बाहेर

लखनऊ | गंगा नदीच्या किनारी वाळूत दफन केलेल्या मृतदेहांची समस्या वाढली आहे. कारण पावसामुळं गंगेच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने किनारी वाळूत दफन केलेले मृतदेह बाहेर येत असल्याचं दिसत आहे. मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून येत आहेत.

स्थानिक पत्रकाराने  बुधवारी काढलेल्या फोटोत एक मृतदेह नदीच्या किनारी आल्याचं दिसतंय. भगव्या रंगाचं वस्त्र असलेल्या या मृतदेहाच्या हातात सर्जिकल ग्लोव्जपण आहेत. मृतदेह प्रयागराजच्या महापालिका कर्मचाऱ्यांनी बाहेर काढला.

मागील 24 तासांपासून 40 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. आम्ही पूर्ण काळजीनं आणि प्रथेनुसार मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहोत. इतकचं नाही तर एका मृतदेहाच्या तोंडात ऑक्सिजन ट्यूब असल्याचं निदर्शनास आलं, असं महापालिकेचे अधिकारी नीरज सिंह यांनी म्हटलंय.

अनेक समुदायांमध्ये मृतदेह दफन करण्याची अनेक वर्षापासून परंपरा आहे. मातीत ज्यारितीने मृतदेह दफन केल्यानंतर त्याची विल्हेवाट लागते तसं वाळूमध्ये होत नाही. आम्हाला जिथे मृतदेह सापडत आहेत. आम्ही तातडीने त्यांच्यांवर अंत्यसंस्कार करत आहोत अशी माहिती प्रयागराजच्या महापौर अभिलाषा गुप्ता नंदी यांनी दिली आहे. तसेच जर कुणाला काही कारणास्तव मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करणं जमत नसेल तर याबाबत आम्हाला कळवा, शासकीय व्यवस्थेतून या मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येतील, असं आवाहन राज्य सरकारने केलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

‘भाजपने ओबीसी समाजाचा विचार केला नसता तर…’; आरक्षणावरून नणंद-भावजय आमनेसामने

सचिन वाझेच्या पत्रातील आरोप खोटे, जनता दूधखुळी नाही- जयंत पाटील

मुंबईत कोरोनाचा पुन्हा उद्रेक?, सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, जाणुन घ्या आकडेवारी

“चंद्रशेखर बावनकुळेंनी इतका भ्रष्टाचार केला की त्यांना तिकीटच दिलं नाही”

43 वेळा कोरोना पाॅझिटिव्ह! 72 वर्षीय आजोबांनी अशी केली कोरोनावर मात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More