बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लॅाकडाऊनमुळं महाराष्ट्रातील ‘या’ खासदाराला मिळाला वेळ, मग काय थेट गहू कापायला घेतला!

सातारा | राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस भयावह बनत चालली आहे. त्यातच कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला असून कोरोनावर प्रभावी असणारं रेमडेसीवीर इंजेक्शनही मिळेनासं झाल्यानं लोक संताप करत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांची शेतातील काम करतानाची फेसबुक पोस्ट सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

दिवाळीनंतर लावलेला खपली गव्हाच्या कापणीला आला होताच. सप्ताहांताच्या दिवशीचा लॉकडाऊन असल्याने गोटे, कराड येथील संपर्क कार्यालय बंद होते. मोकळा वेळही मिळाला. हातात विळा घेऊन तयार झालेला खपली गहू कापून घेतला आणि हा वेळ सत्कारणी लावला. मध्यंतरी दोन अवकाळी पाऊस झाले त्यामुळे पिकाचे बरेच नुकसान झाले, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

शेतकरी शेतात अपार कष्ट करतो, पिकाला जीवापाड जपतो पण तरीही तो निसर्गाच्या कृपेवरच अवलंबून असतो. जोपर्यंत सर्व संकटातून पीक सुखरूप घरात पोहोचत नाही तोपर्यंत काहीच खरं नसतं. म्हणूनच पीकाचं सगळं वेळापत्रक सांभाळून पिकाची आणि जमिनीची देखील निगा घ्यावी लागते, तेंव्हाच ही काळी आई शेतकऱ्यांना भरभरुन देते, अशी आशयाची फेसबुक पोस्ट श्रीनिवास पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपत प्रवेश केला होता. त्यामुळे साताऱ्यात पोटनिवडणूक लागली होती. आणि राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील हे निवडून आले होते.

थोडक्यात बातम्या –  

इतक्या दिवसांचा असू शकतो महाराष्ट्रातील लॉकडाऊन, दोन दिवसात होणार निर्णय!

“मुख्यमंत्री महोदय, तुमच्या मंत्र्यांना आवरा”; भर बैठकीत देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

नागरिकांनो तयारी ठेवा!; मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनसंदर्भात मांडली ‘ही’ महत्त्वाची भूमिका

मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे गैरहजर; अनुपस्थितीचे खरे कारण आले समोर

महाराष्ट्रात संपूर्ण लॅाकडाऊन होणार?, आत्ताच बाहेर आली ‘ही’ महत्त्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More