पुणे | 9 आॅगस्टला मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याबाबत आदेश दिले आहेत.
मराठा आरक्षणासाठी अनेक दिवसांपासून राज्यात मोर्चेकऱ्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. अद्याप सरकारकडून ठोस पावलं उचलली जात नाहीत त्यामुळे मराठा मोर्चेकऱ्यांनी 9 आॅगस्टला राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती.
दरम्यान, मराठा मोर्चाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलं होतं. यामुळे उद्या आंदोलनामुळे कुठे हिंसक प्रकार घडून विद्यार्थ्यांना यांचा त्रास होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-खासदार हिना गावितांकडून मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर!
-अक्षय कुमारचा इंस्टाग्रामवर धुमाकूळ, तब्बल एवढे फाॅलोअर्स
-आता आरक्षणासाठी लिंगायत समाजही रस्त्यावर उतरणार!
-करूणानिधींच्या अंत्यसंस्कारावेळी समर्थकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज!
-चित्रपट दाखवणं तुमचं काम आहे, खाद्यपदार्थ विकणं नाही!
Comments are closed.