‘श्रद्धा वालकर प्रकरणामुळं…’, तुनिशाच्या बाॅयफ्रेंडचा धक्कादायक खुलासा

मुंबई| प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्मानं(Tunisha Sharma) शनिवारी मालिकेच्या सेटवर गळफास घेत जीवन संपवलं आहे. यावरून आता तुनिषाच्या आईनं तुनिषाचा बाॅयफ्रेंड(Tunisha Boyfriend) शिझान खान याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

तुनीषाची आई खुलासा करताना म्हणाली आहे की, तुनिषाच्या आत्महत्येच्या 15 दिवस आधी शिझानसोबत तिचा ब्रेकअप झाला होता. त्यामुळं ती खचून गेली होती आणि म्हणूनच तिनं आत्महत्या केली, असा आरोप तुनिषाच्या आईनं शिझानवर केला आहे. या प्रकरणी शिझानला पोलिसांनी अटकही केली आहे.

शिझान पोलिसांना माहिती सांगताना म्हणाला आहे की, श्रद्धा वालकर प्रकरणामुळं मी अस्वस्थ झालो होतो. म्हणून मी तुनिषाशी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. आपलं एकमेकांवर प्रेम असलं तरी धर्म आड येणार आणि आपल्या वयात खूप अंतर आहे, ही दोन कारणं सांगून मी तिच्यासोबत ब्रेकअप केला होता.

ब्रेकअपनंतरही तुनिषानं जीवन संपवण्यचाा प्रयत्न केला होता, परंतु मी तिला वाचवलं होतं. यानंतर तिच्या आईची भेट घेऊन तुमच्या मुलीवर लक्ष ठेवा आणि तिची काळजी घ्या, असं तिच्या आईला सांगितल्याचा दावा शिझाननं केला आहे.

दरम्यान, तुनिषानं 2013 मध्ये ‘भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. यानंतर तिनं अनेक चित्रपट आणि शोमध्ये काम केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More