बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ दोन नेत्यांच्या मुर्खपणामुळे नरेंद्र मोदी दोनवेळा पंतप्रधान झाले- असदुद्दीन औवेसी

लखनऊ | उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी बसपाच्या सर्वेसर्वा मायावती आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अखिलेश यादव आणि मायावती यांच्या मुर्खपणामुळे नरेंद्र मोदी दोन वेळा पंतप्रधान झाले, असं असदुद्दीन औवेसी यांनी म्हटलं आहे. औवेसी सुलतानपुर येथील सभेत बोलत  होते.

सुलतानपुर  लोकसभा मतदारसंघात 2019 ला भाजपला विजय मिळाला होता. तेव्हा औवेसी निवडणुक लढला नव्हता, सुलतानपुरमध्ये भाजपला यश कसं मिळालं, असं असदुद्दीन औवेसी म्हणाले. मुसलमान मतदारांनी समाजवादी पक्षाला मतदान केलं नाही, असं अखिलेश यादव म्हणाले होते. त्यावर मुसलमान काय त्यांचे कैदी आहेत का?, असा सवालही असदुद्दीन औवेसी यांनी सभेत बोलताना उपस्थित केला.

भाजप दोन वेळा मुस्लिमांच्या मतांनी जिंकलेली नाही, असं असदुद्दीन औवेसी म्हणाले. समाजवादी पक्षावर असदुद्दीन औवेसी यांनी प्रखर शब्दात टीका करताना मुसलमान काय तुमचे गुलाम आहेत काय? असा हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने अल्पसंख्यांकांसाठी 116 कोटी रूपयांची तरतुद केली होती. मात्र योगी सरकारने फक्त 10 कोटी खर्च केला, असं असदुद्दीन औवेसींनी म्हटलं आहे. मी हा मुद्दा संसदेमध्ये लावून धरला होता परंतु अखिलेश यादव शांत राहिले होते.  तसेच2022 च्या विधानसभा उत्तरप्रदेश निवडणुकीमध्ये एमआएम 100 जागांवर लढणार असल्याची घोषणा असदुद्दीन औवेसी यांनी केली.

थोडक्यात बातम्या- 

‘तालिबान्यांचं सरकार फक्त सहा महिने टिकणार त्यानंतर….’; अफगाणिस्तानमधील मोठी माहिती समोर!

‘अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी…’; भाजपच्या ‘या’ नेत्यांचं पवारांना आव्हान

#T20WorldCup| …म्हणून चहलच्या जागी राहुल चहरला मिळाली संधी; निवडकर्त्यांने दिलं स्पष्टीकरण

सुपर लेडी! तालिबानच्या बंदूकधारी दहशतवाद्यासमोर ‘ती’ निडरपणे राहिली उभी

‘तुमचा भुजबळ करू म्हणणाऱ्यांना…’;निर्दोष मुक्ततेनंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More