मोठी बातमी! ‘या’ कारणांमुळं कसबा पोटनिवडणूक भाजपसाठी ठरू शकते मोठं आव्हान

पुणे | 22 डिसेंबर रोजी भाजपच्या आमदार मुक्ता टिळक(Mukta Tilak) यांचं निधन झालं. त्यामुळं कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झालीये. ही पोटनिवडणूक 27 फेब्रुवारीला होणार आहे. तर मतमोजणी 2 मार्चला होणार आहे. ही निवडणूक बिनविरोधी व्हावी यासाठी भाजपचे अतोनात प्रयत्न सुरू आहेत. कारण भाजपचा(BJP) मित्र गट म्हणजे शिंदे गटानं जेव्हा ठाकरे गटाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर जेव्हा पोटनिवडणुक जाहीर झाली तेव्हा ऐनवेळी या निवडणुकीतून माघार घेतली होती त्यामुळं ती पोटनिवडणूक बिनविरोधी पार पडली. मग भाजपला आता त्यांच्याबाबतीत तसंच काही अपेक्षित असावं. पण आता काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना म्हणजेच महाविकास आघाडीनं भाजप विरोधात निवडणूक लढवण्याची भूमिका घेतलीये. त्यामुळं आता ही पोटनिवडणुक भाजपसाठी मोठं आव्हान ठरू शकते. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षातून कोणाकोणाची उमेदवारीसाठी नाव पुढं येत आहे. आणि या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची रणनीती काय हे जाणून घेऊयात.

कसबा निधानसभा मतदारसंघाकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण भाजपकडून उमेदवारीसाठी कोणाकोणाची नाव समोर येत आहेत, याचा आढावा घेऊयात. मेधा कुलकर्णींच्या नावाची सध्या चर्चा आहे. मेधा कुलकर्णी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. परंतु तरीही त्यांना 2019 मध्ये त्यांना डावलून भाडपनं चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळं आता मेधा कुलकर्णींना संधी देण्यासाठी भाजपसाठी ही सुवर्णसंधी असू शकते. पण तरीही त्यांच्या नावासमोर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही.

आता मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनीही उमेदवारी टिळक कुटुंबात मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच त्यांना तुम्ही निवडणुक लढवणार का असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की, जर पक्षाने संधी दिली तर मी ही निवडणुक लढवायला तयार आहे. यावेळी त्यांनी मुलगा कुणालदेखील चांगलं काम करतो असं सांगत टिळक कुटुंबात उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केलीये. आता या सगळ्यात भाजपमधील वरिष्ट नेते काय निर्णय घेतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आता राष्ट्रवादी पक्षाकडून रूपाली ठोंबरेही इच्छुक आहे. रूपाली ठोंबरे पाटलांनी तर पोटनिवडणुका जाहीर होण्यापूर्वीच ही निवडणुक आपल्याला लढवायची आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती. आधीपासून काॅंग्रेस निवडणुक लढवते म्हणून तेच लढवतील आणि भाजप निवडूण येतं म्हणून दरवेळी भाजपच निवडूण येईल,असं आता होणार नाही. परंतु कसबा पोटनिवडणुक बिनविरोध होणार नाही असं मी वरिष्ठांना निवेदन दिलं आहे, असं नुकतंच रूपाली पाटील म्हणाल्या आहेत.

पण काॅंग्रेसनंही या पोटनिवडणुकीसाठी दावा केलाय. तसेच दोन वेळा काॅंग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याचा दाखलाही काॅंग्रेसनं दिलाय. त्यामुळं काॅंग्रेसकडून माजी नगरसेवक अरविंद शिंदे, रविंद्र धंगेकर, कमल व्यवहारे यांच्या नावाच्या चर्चा आहेत.

तर आता ठाकरे गटाकडूनही या मतदार संघावर दावा केला जात आहे. त्यामुळं महाविकास आघाडीकडून नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे. जर महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी आपला मुद्दा लावून धरला तर हे तिन्ही पक्ष ही निवडणुक स्वायत्तही लढवू शकतात. पण या सगळ्यात भाजपसाठी ही पोटनिवडणुक मोठं आव्हान ठरू शकते.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More