‘या’ कारणांमुळं पठाण बाॅक्स ऑफीसवर कल्ला करतोय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुबंई | रिलीज व्हायच्या आधी बाॅयकाॅट (Boycott) होणाऱ्या पठाण (Pathan) चित्रपटाचं अडव्हानस बुकिंग केलं जातय. 25 जानेवारीला रिलीज झालेला चित्रपट आता बाॅक्स ऑफीसवर धुमाकुळ घालत आहे. बाॅयकाॅटपासून सुरु झालेल्या पठाण चित्रपट पहिल्याच दिवशी लोकांना का आवडला?

हिदीं सिनेमासृष्टीत (Hindi cinema) इतक्या मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होणार पठाण हा पहिला चित्रपट ठरला आहे. भारताच्या सिनेमासृष्टीत पहिल्यादाचं असं झालं असेल की एखादा चित्रपट प्रदर्शित होताच त्याची स्क्रीन काऊंट एवढ्या प्रमाणात वाढला आहे. काही ठिकाणी पठाणचं प्रचंड कौतुक केलं जात आहे.

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपटातील ‘बेशरम’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं. यावेळी दिपीकाने (Deepika Padukone) घातलेली भगवी बिकनी विरोधाचं कारणं ठरलं. हिंदी चित्रपट नेहमीच हिंदूच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करतात. असा आरोप केला गेला. मात्र सध्याची पठाणची बाॅक्स ऑफिसवर चालणारी पकड बघता त्याचा काही परिणाम झाला असं वाटत नाही.

आता राहिली दुसरी बाजू ती म्हणजे इतक्या कमी वेळेत चित्रपट कसा कसा प्रसिद्ध झाला. तर त्याचं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारणं म्हणजे शाहरुखने चार वर्षानंतर बनवलेला चित्रपट, शाहरुख (shahrukh khan) सोबत सगळ्यांच्या लाडक्या भाईजानसोबत शेअर करण्यात आलेलं स्क्रिनिंग आणि चित्रपटातील दाखवण्यात आलेले YRF स्पाई हे होतं.

सगळ्याच महत्त्वाचं कारण ठरत आहे ते या चित्रपटात दाखवण्यात आलेली देशभक्ती (Patriotism) हा चित्रपट देशासाठी लढणाऱ्या एका सैनिकाची कथा आहे. त्यामुळे हा चर्चेत आला आहे. मी मगाशी म्हणलं ते YRF स्पाई नेमकं काय होत. तर असे चित्रपट ज्यामध्ये रॉ एजंट नायक म्हणून काम करत असतो उदाहरणार्थ सांगायचं झाल्यास टायगर, वाॅर अशी देता येतील.

महत्त्वाच्या बातम्या