वॉशिंग्टन | नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ट्विटरने ट्रम्प यांचं अकाऊण्ट बारा तासांसाठी, तर फेसबुकने 24 तासांसाठी लॉक केलं आहे.
नागरी अखंडत्वाबद्दल नियम मोडणारे तीन ट्विट्स डिलीट न केल्यास ट्रम्प यांच्यावर कायमस्वरुपी बंदी आणण्याचा इशारा ट्विटरने दिला.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये अमेरिकन कॅपिटल भवनाबाहेर जोरदार निदर्शनं केली होती. समर्थक आणि पोलिसांमध्ये यावेळी जोरदार झटापट झाली.
वॉशिंग्टन डीसीमध्ये उद्भवलेल्या हिंसक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचे तीन ट्वीट्स हटवावेत, अशी आमची मागणी आहे. नागरी अखंडत्व धोरणाचे वारंवार आणि गंभीर उल्लंघन त्यांनी केलं आहे” असं ट्विटरने म्हटलं आहे. ट्विट्स न हटवल्यास ट्रम्प यांचे अकाऊण्ट लॉक राहील, असंही ट्विटरने स्पष्ट केलं आहे.
As a result of the unprecedented and ongoing violent situation in Washington, D.C., we have required the removal of three @realDonaldTrump Tweets that were posted earlier today for repeated and severe violations of our Civic Integrity policy. https://t.co/k6OkjNG3bM
— Twitter Safety (@TwitterSafety) January 7, 2021
थोडक्यात बातम्या-
राज्यातील ‘या’ भागात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढय़ात मराठी माणसांची एकजूट काय आहे हे दाखवूया- उद्धव ठाकरे
‘या’ भाजप नेत्याची चौकशी होणार; मुंबई महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप
“आमच्यावर टीका केल्याशिवाय ते महाराष्ट्रात मोठे होऊ शकत नाहीत”
नामांतरावरुन राजकारण खेळू नका, संभाजी महाराज आमचे आराध्य दैवत- बाळासाहेब थोरात