बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ भीतीमुळे अमरावतीमधील संपूर्ण गाव रात्रभर झोपलं नाही

अमरावती | गेल्या आठवड्याभरापासून राज्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. त्यामुळे पुराचं संकट कायम आहे. गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. अशातच मुसळधार पावसानं अमरावतीमध्ये तलाव फुटण्याच्या भीतीनं सगळं गाव रात्रभर जागं राहिल्याची घटना समोर येत आहे.

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे अमरावती येथील अऱ्हाड, कुऱ्हाडयेथील ब्रिटीशकालीन भीवापूरकर तलावाला तडे गेले असल्यानं हा तलाव फुटण्याची शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे तलाव फुटला तर खूप नुकसान आणि जीवीत हानी होईल या भीतीनं संपूर्ण गाव रात्रभर झोपलंच नाही. काही लोकांनी तर गाव सोडून जाण्यासही सुरुवात केलीये.

तलाव फुटण्याच्या भीतीनं गाव रात्रभर जागं असल्याचं समजताच स्थानिक आमदार रवी राणा यांनी तात्काळ त्या गावामध्ये जाऊन प्रशासनासोबत संपर्क साधला. राणा यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलावून एसडीआरएफचे पथक आणि रेस्क्यू टीम रात्री उशीरा दाखल केली.

दरम्यान, आमदार रवी राणा यांनी संपूर्ण जागं असल्याचं समजताच तिथे जाऊन नागरिकांशी संवादही साधला. त्यांनी तलावाची पाहणी देखील केली. याशिवाय उपविभागीय महसूल अधिकारी रणजित भोसले, तहसीलदार व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात जाऊन पाहणी केली.

थोडक्यात बातम्या – 

करदात्यांसाठी मोठी बातमी; इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली

IND vs ENG: कोरोनाच्या भीतीमुळे वरिष्ठ खेळाडूचा पाचवी टेस्ट खेळण्यास नकार?

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीच मुंबईतलं लसीकरण राहणार बंद!

धोनीच्या नियुक्तीवरून वादाला सुरूवात, बीसीसीआयकडे लेखी तक्रार दाखल

भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याची टॉवेलने गळा आवळून हत्या, राहत्या घरात मृतदेह सापडल्याने खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More