बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ कारणामुळे 1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणं महागणार!

नवी दिल्ली | भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रत्येक आर्थिक वर्षात टोल टॅक्स वाढवत असतं. त्यामुळे आता 1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणं महागणार आहे. टोल दरात 5 टक्क्यांनी वाढ करण्यात येणार आहे. तर मासिक पासच्या किंमतीही 10 ते 20 रुपयांनी वाढू शकतात.

फास्ट-टॅगच्या टोल टॅक्समध्ये वाढ केल्यामुळे सर्वसामान्यांपासून ते ट्रांसपोर्टपर्यंत सर्वांनाच याचा फटका बसणार आहे. फास्ट-टॅगच्या अनिवार्यतेनंतर टोल टॅक्समध्ये वाढ केली जाणार आहे. त्यामुळे वाहतूकदारसह सामान्य नागरिकांवरही त्याचा मोठा परिणाम होणार आहे. त्याचबरोबर गोरखपूरमधील तीन टोल प्लाझांवरील टोल दर 5 ते 30 रुपयांनी वाढणार आहेत. टेनुआ आणि शेअरपूर चामराह येथील टोल वसुलीच्या आधारे अधिकारी लवकरच टोल दर वाढवण्याचा प्रस्ताव पुढे पाठवणार आहेत. त्यामुळे मासिक टोलमध्येही 10 ते 20 रुपयांची वाढ होणार आहे, परिणामी राष्ट्रीय महामार्गांवरुन दळणवळण करणाऱ्या लोकांवर याचा बोजा वाढू शकतो.

टोल टॅक्स प्रत्येक आर्थिक वर्षात वाढतो. नवीन दर 1 एप्रिलपासून लागू होणार असून हा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. देशात 16 फेब्रुवारीपासून फास्ट-टॅग सर्व वाहनांसाठी अनिवार्य करण्यात आलं आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या म्हणण्यानुसार, फास्टॅगमुळे टोल वसुली 104 कोटींवर गेली आहे, असं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण गोरखपूर झोन प्रकल्प संचालक सीएम द्विवेदी म्हणालेत.

दरम्यान, फास्ट-टॅग इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली टोल प्लाझावरील वेटिंग टाईम कमी करते. तसेच यामुळे इंधनाचा वापर कमी होईल, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. राष्ट्रीय महारामार्गांवरुन धावणाऱ्या सर्व वाहनांनी फास्टॅगचा वापर सुरु केला तर दरवर्षी भारतात पेट्रोल आणि डिझेलवर 20,000 कोटी रुपयांची बचत होईल, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या

मासिक पाळी दरम्यान तरुणीच्या डोळ्यातून वाहू लागलं रक्त, वाचा काय आहे प्रकरण

वडिलांच्या दुसऱ्या विवाहाला मुलगी न्यायालयात आव्हान देऊ शकते- मुंबई उच्च न्यायालय

नात्याला काळीमा फासणारी घटना; पॉर्न पाहून दारुड्या मुलानं आईवर केला लैंगिक अत्याचार

मानवी केसांनी भरलेले 2 ट्रक जवानांनी पकडले, एक किलो केसांची किंमत ऐकून थक्क व्हाल

अब्रू वाचवण्यासाठी माजी मंत्र्यांनी पळपुटेपणा केला- धनंजय मुंडे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More