ना मुंबई, ना दिल्ली बंडासाठी गुवाहाटीच का? शिंदेंनी सगळंच सांगून टाकलं!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | विधानपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर शिंदे नाॅट रिचेबल झाले. त्यानंतर त्यांनी मोठा प्रवास करत सुरत मार्गे गुवाहाटी गाठली. शहाजी बापू पाटलांमुळं गुवाहाटीचे झाडी,डोंगर प्रसिद्ध झाले. त्यानंतर जो काही सत्तासंघर्ष, बंड झालं ते महाराष्ट्राच्या इतिहासातील मोठं बंड ठरलं. शिंदेंसोबतचे आमदार गुवाहाटीला जाऊन पोहचले, मात्र यावेळी एक प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. बंड करण्यासाठी शिंदेंना परराज्यात का जावं लागलं? त्यासाठी मुंबई किंवा महाराष्ट्रातील दुसरं ठिकाण त्यांनी का नाही निवडलं ? किंवा गुवाहाटीला जाताना शिंदेंनी सुरत मार्गे जाण्याचा का निर्णय घेतला. याचं उत्तर आता खुद्द शिंदे गटाकडून मिळालं आहे.

जेव्हा शिंदे सुरतमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांच्या सोबत असणाऱ्या आमदारांची संख्या 27 होती. तेथून गुवाहाटीला रवाना होईपर्यंच ती 33 वर पोहचली. हे सगळे लोक सुरतच्या विमानतळावरुन गुवाहाटीला गेले. त्यानंतर शिंदेंसोबत असणाऱ्या आमदारांची संख्या वाढू लागली. शिवसेनेचे संख्याबळ कमी होऊ लागलं.

शिंदे त्यांच्या मतावर ठाम होते. वेगळं होणं किंवा राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत शिवसेनेची युती तोडणं. त्यामुळं अखेर शिंदेंनी त्यांचा निर्णय घेतला. त्यानंतर झालेला सत्ताबदल, वाद सगळ्यांना सर्वश्रुत आहे. इतकं सगळं झाल्यानंतर सध्या केंद्रिय निवडणूक आयोगाकडे अजूनही शिवसेना कोणाची? असा वाद सुरु आहे. याचवेळी 30 जानेवारीला कागदपत्रं सादर करण्याचा शेवटचा दिवस होता. याचवेळी आपण सुरतमार्गे गुवाहाटीला का गेलो याचं स्पष्टीकरण शिंदे गटाकडून देण्यात आलं आहे.

मुंबईत शिवसेनेचा दबदबा आहे. तेथे धोका होता. तसेच ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वारंवार धमक्यांमुळं आम्हाला परराज्यात जावं लागलं. हे बंड केलेले आमदार महाराष्ट्रात परतले तर फिरणं कठीण होईल या राऊतांच्या वक्तव्याचा दाखला शिंदे गटानं आयोगाला सादर केला आहे. थोडक्यात काय तर संजय राऊत यांच्या धमक्यांमुळं आमदारांना परराज्यात जावं लागलं आहे. असं लेखी उत्तर शिंदे गटानं निवडणूक आयोगासमोर सादर केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या