Top News महाराष्ट्र मुंबई

“बलात्काराची तक्रार मागे, तरीही ‘या’ कारणामुळे धनंजय मुंडेंवर कारवाई करा”

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात करण्यात आलेली बलात्काराची तक्रार रेणू शर्मानं मागं घेतली आहे. परंतू रेणू शर्मानं तक्रार अचानक मागं घेतल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. यातच भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी एक गौप्यस्फोट केला आहे.

धनंजय मुंडे यांनी तक्रार मागं घेण्यासाठी दबाव टाकल्यानेच रेणू शर्मानं आपली तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला, असा आरोप उमा खापरे यांनी केला आहे. त्यांनी याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर थेट टीका केली आहे.

अगोदरपासून तिच्यावर तक्रार मागे घेण्यासंबंधी दबाव होता. आता तिनं ही तक्रार मागं घेतली आहे. आम्हाला याचं आश्चर्य वाटत नाही. आमचा मुद्दा हा आहे की धनंजय मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रात दुसऱ्या बायकोचा उल्लेख तसंच तिच्यापासून झालेल्या दोन मुलांचा उल्लेख केला नाही ते कायद्याच्या परिघाबाहेर आहे. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी प्रतिक्रिया उमा खापरे यांनी दिली आहे.

दरम्यान, शर्मा यांनी मुंडे यांच्याविरोधात शारीरिक छळाचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. मात्र आज सकाळी रेणू शर्मा यांनी कौटुंबिक कारणास्तव आपण ही तक्रार मागे घेत असल्याचं पोलिसांना सांगितलं.

थोडक्यात बातम्या

“मोदींनी ज्या इमारतीला भेट दिली त्याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग लागली”

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली!

वीज कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी ‘या’ माजी आमदाराला तीन महिन्यांचा कारावास!

“भाजपने अद्यापही सुशांत सिंहच्या आत्म्याला मुक्ती मिळू दिली नाही”

सायरस पुनावालांची मोठी घोषणा; आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या