बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डेल्टा प्लस व्हेरिएंटनं टेंशन वाढवलं; राज्यातील निर्बंध पुन्हा कडक होण्याची शक्यता

मुंबई | गेल्या वर्षभरापासून कोरोना रोगाने सगळीकडे थैमान घातलं आहे. देशामध्ये सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. आताकुठे ही लाट आटोक्यात आली होती. सर्व पूर्वीसारखं सुरळीत होत होतं. परंतू अशातच डेल्टा प्लस व्हेरिएंटनं डोकं वर काढायला सुरूवात केली आहे.

आतापर्यंत या व्हेरिएंटचे देशात एकूण 40 रूग्ण सापडले आहेत. यातील सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्र राज्यात 21 रूग्ण आढळून आले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील निर्बंध पुन्हा कडक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बुधवार 23 जून रोजी राज्यमंडळाची बैठक घेण्यात आली होती.

कोरोनाच्या ब्रेक द चेन यासाठी 20 दिवसांपूर्वी राज्य सरकारनं अनलॉकचा निर्णय घेतला होता. मात्र डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका, त्याचप्रमाणे काही बाजारपेठांमध्ये खूप गर्दी पाहायलाही मिळत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच दुकानांच्या वेळा पुन्हा एकदा कमी करण्यात येतील, असा इशाराही सरकारकडून देण्यात आला आहे.

तसेच राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याचा धोका असल्याचा इशारा केंद्र सरकारनं राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी करणं हे आरोग्य प्रशासनापुढे मोठं आव्हान आहे. कारण महाराष्ट्रात येत्या तीन- चार आठवड्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

“आदित्यजी, वडिलांकडे हट्ट धरा, हवंतर बाळासाहेबांचं नाव द्या पण ते काम पूर्ण करा”

राजगडावर रोपवे होणार का?; आमदार संग्राम थोपटेंनी दिलं हे स्पष्टीकरण

नाना पटोले तातडीने दिल्ली दरबारी, ‘स्वबळाची भाषा’ कारण?

‘लस न घेतलेल्या आमदारांना विधानसभेत प्रवेश नाही’; बिहार विधानसभा अध्यक्षांचं फर्मान

‘लशींसाठी मोदींचे जाहीर आभार माना’; युजीसीची महाविद्यालयांना अजब सूचना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More