बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील सर्व शाळा सुरु करता येणार का?; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्या…

नवी दिल्ली | जवळपास गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकारने 15 जुलैपासून कोरोनामुक्त गावातील शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. येत्या काही दिवसात राज्यातील सर्व शाळा सुरु करण्याच्या हाचलाची चालू असतानाच आता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी शाळा सुरु करण्यासाठी वाट पाहावी लागणार असल्याचं म्हटलं आहे.

राज्याने शाळा सुरु करण्यासाठी घाई करु नये. शाळा सुरु करण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी, असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी म्हटलं आहे. यामागील कारण सांगताना भारती पवार म्हणाल्या की, परदेशात कोरोनाचे आणखी नवीन स्ट्रेन सापडले आहेत. यामुळे कोरोनाचा धोका पुन्हा वाढू शकतो.

अशातच महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात आहेत. तसेच लहान मुलांवर कोरोना लसीची ट्रायल अद्याप सुरु आहे. यामुळे शाळेची घंटा इतक्यात वाजवण्यात येणार नाही, असं भारती पवार यांनी सांगितलं आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

दरम्यान, शाळांना लागलेली कुलूपे खोलण्याचा अधिकार राज्य सरकारांना आहे. महाराष्ट्रात कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. पुढील आठवड्यात उर्वरीत वर्ग सुरु करण्यासंदर्भात शिक्षण विभागाची महत्वाची बैठक होणार आहे.

थोडक्यात बातम्या –

‘भाजप शिवसेनेचा कायमचा शत्रू नाही’; निलम गोऱ्हेंचं मोठं वक्तव्य!

राहुल, जडेजाने ठोकलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताकडे ‘इतक्या’ धावांची आघाडी, अँडरसन आणि रॉबिनसनची भेदक गोलंदाजी!

बुलेटवर कपल करत होतं अश्लील चाळे त्यानंतर गावकऱ्यांनी गाडी अडवुन…पाहा व्हिडीओ!

पुणे मेट्रोवरुन भाजप-राष्ट्रवादीत वाद पेटला! आता फडणवीस मेट्रोची पाहणी करणार

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यात आज नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More