बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ कारणाने महाविकास आघाडीच्या नेत्यांची राज्यपालांसोबत ठरलेली आजची भेट झाली रद्द!

मुंबई | काल विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेत राज्यातील घडामोडींची सविस्तर माहिती राष्ट्रपतींना द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेते आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून राज्यात सुरु असलेल्या घडामोडींसंदर्भात महाविकासआघाडी सरकारकडून स्वत:ची बाजू मांडणार होते. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुंबईत नसल्याने ही भेट टळली आहे.

आज आघाडी सरकारमधील नेते राज्यपालांची भेट घेणार होते, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली होती. मात्र, राज्यपाल 28 मार्चपर्यंत  देहरादून येथे असणार आहेत. उत्तराखंड दौरा नियोजित असला तरी सध्याची परिस्थिती पाहता अनेक उलटसुलट तर्कवितर्क लावले जात आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांची काल भेट घेतली होती. जवळपास तासभर भाजपचे नेते आणि राज्यपालांमध्ये चर्चा झाली होती. या भेटीत भाजपने राष्ट्रपती राजवटीविषयी चर्चा केली की नाही, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, राज्य सरकारमध्ये नैतिकता उरली नाही. मुख्यमंत्री या प्रकरणांवर काही बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलतं केलं पाहिजे. तसंच राज्यपालांनी राज्याचे घटनात्मक  प्रमुख म्हणून  मुख्यमंत्र्यांकडून अहवालही घेतला पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं.

दरम्यान,  अँटिलिया बाहेरचं स्फोटकं प्रकरण, सचिन वाझे प्रकरण, मनसुख हिरेन हत्या प्रकरण, परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप, राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं प्रकरण या सर्व घडामोडींनी राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेते आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून महाविकास आघाडी सरकारवर लावण्यात आलेल्या आरोपांच्या सत्यतेची माहिती त्यांना देणार होते. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणखी काही काळ राज्यपालांच्या भेटीसाठी ताटकळत राहावं लागणार आहे. मात्र, यावरुन पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत.

थोडक्यात बातम्या

मुकेश अंबानींच्या घराजवळ स्काॅर्पिओनंतर त्याच ठिकाणी दुचाकी सापडल्यानं खळबळ

मनसुख हिरेन यांचा सचिन वाझेंच्या गाडीत बसतानाचा व्हिडीओ आला समोर, पाहा व्हिडीओ

रश्मी शुक्लांनी भाजपमध्ये राहण्यासाठी ‘या’ आमदारावर आणला दबाव; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

विमाधारकांसाठी आनंदाची बातमी; अटी पूर्ण होत नसतील तर ‘या’ कालावधीत करू शकता पॉलिसी रद्द

अकोल्यात चक्क बकऱ्यांची बँक! ‘गोट बँक ऑफ कारखेडा’ या बँकेचं काम जाणून घ्या तूम्हीही व्हाल थक्क

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More