बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांना आर्थिक फटका

मुंबई | सध्या हिवाळा सुरु आहे. त्यामुळे सगळीकडे कडाक्याची थंडी पहायला मिळत आहे. ऐन थंडीतही अवकाळी पावसाची हजेरी पहायला मिळत आहे. या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.

थंडीतही पडणाऱ्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकाचं नुकसान झाल्यामुळे ते चिंतेत आहेत. याबरोबरच काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचाही सामना करावा लागत आहे.

थंडीची लाट सुरु असताना पडणाऱ्या अवकाळी पावसानं नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. अशातच अजूनही पावसाचा रोख थांबलेला नाही. त्यामुळे चिंतेत आणखी वाढ झाली आहे.

दरम्यान, गारपिटीमुळे रब्बी हंगामातील गव्हू, हरभरा आणि ज्वारीचं देखील मोठं नुकसान झालं  आहे. या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी शेतकऱ्यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या –

…म्हणून पार्टीवर 10 हजार रुपये खर्च करुन करतायेत कोरोना पॉझिटिव्ह लोकांसोबत डिनर

“कुणी पाठीशी उभं नाही राहिलं तरी मी एकटा लढेन”

पालकांनो सावधान! लहान मुलांना कोरोना होण्याची संख्या ‘इतक्या’ पटीने वाढली

“गोड बोलण्यासाठी तिळगूळाची गरज नाही, आमचा कारभार उघड आहे”

पुढील 2-3 दिवस राज्यात थंडीचा जोर कायम, हवामान खात्याचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More