‘सावित्रीबाईंवर तर खरोखर शेण फेकलं गेलं, माझ्यावर तर…’, केतकी चितळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
मुंबई | अभिनेत्री केतकी चितळे(Ketki Chitale) नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं चर्चेत येत असते. यामुळं तिला जेलची हवाही खावी लागली आहे. परंतु तरीही केतकी आपले मत बिनधास्तपणे मांडत असते.
मंगळवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त केतकीनं त्या तिच्या प्रेरणास्थान आहेत, अशा आशयाची पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिनं सावित्रीबाई फुलेंची तयास मानव म्हणावे का ?, ही कविता सादर केली आहे.
ही कविता सादर केल्यानंतर ती म्हणाली आहे की, जसे आपण आपल्या आदर्श व्यक्तीकडून काहीतरी शिकत असतो, प्रेरणा घेत असतो. तशी मी रोज त्यांच्या कवितेतून, त्यांच्याकडून ही प्रेरणा घेत असते की, त्यांच्यावर तर खरोखरच शेण फेकलं गेलं, माझ्यावर तर फक्त शाब्दिक शेण फेकलं जात, म्हणून त्या मला प्रेरणा देतात.
तसेच केतकीनं या पोस्टला कॅप्शन देताना पत्रकार तिच्याबाबतीत नरेटिव्ह बातम्या देतात, असा आशय देत पत्रकारांना सुनावलं आहे. तिनं या पोस्टच्या कमेंट्स डिसेबल केल्या आहेत. तसेच कोणीही भलत्याच पोस्टवर कमेंट ऑन कर असं लिहून बोर करू नका, बोर केल्यास ब्लाॅक करण्यात येईल, असंही केतकीनं लिहिलं आहे.
दरम्यान, अलीकडेच एका नेटकऱ्याच्या कमेंट्सला उत्तर देताना केतकी म्हणाली होती की, काली मातेला दारूचा नैवेद्य दाखवतात. तिच्या या वक्तव्यामुळंही ती चर्चेत आली होती.
महत्वाच्या बातम्या-
- ‘उर्फीला हात लावून दाखवा’; या महिला नेत्याचा चित्रा वाघ यांना थेट इशारा
- वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर विराट-रोहितवर…, कपिल देवची स्पष्ट भूमिका
- NDTV बाबत अदानींचा मोठा निर्णय!
- खुल्लम खुल्ला प्यार… बाईकवरच सुरू झाला कपलचा रोमान्स, व्हिडीओ व्हायरल
- दिल्लीतील कांझावाला प्रकरण आहे तरी काय?, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
Comments are closed.