राखीच्या पहिल्या पतीची राखीला खंबीर साथ; म्हणतो राखीच्या डोळ्यात…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | राखी (Rakhi) आणि आदिल (Adil) प्रकरण सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे. राखीचा पती आदिलचे एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअर (Extramarital affair) असल्याचं तिनं मिडियाशी बोलताना सांगितलं. यामुळेच विवाहबाह्य संबंध आणि फसवणुकीचा आरोप करत राखीने आदिलवर एफआयआर (FIR) दाखल केला आहे.

त्यानंतर राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानी याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. सध्या ही केस कोर्टात सुरु आहे. याचदरम्यान राखीचा पहिला पती रितेश राजने (Ritesh Raj) या वादात उडी घेतली आहे. त्यांना त्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये त्यानं आपण राखीच्यासोबत असल्याचं सांगितलं आहे.

तीन महिन्यांपूर्वी मला राखीनं याबद्दल सांगितलं होतं. राखी कधी खोट बोलणार नाही. एखाद्याचं ह्रदय तुटत तेव्हा काय वेदना होतात हे तुला समजत असावं असा टोलादेखील त्यान राखीला लगावला. आता जो तुला त्रास होत आहे,त्यांचा मीदेखील सामना केला आहे. मी तुझ्यासोबत आहे असं राजेशनं व्हिडीओत म्हणलं आहे.

राखीच्या डोळ्यात खरेपणा आहे. कोर्टाचा (Court) निकाल काय येईल हे पहावं लागेल,असं देखील त्यानं म्हणलं आहे.राखीच्या जीवाला धोका असल्याचं राजेशनं म्हणलं आहे. तो व्हिडिओत वारंवार राखीला काळजी घेण्यास सांगत होता. दरम्यान, राजेश आणि राखीचा घटस्फोट काही महिन्यांपूर्वीचा झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या