बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘नरेंद्र मोदींच्या भीतीने 35 हजार उद्योजकांनी देश सोडला’; अर्थमंत्र्यांची टीका

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक नोटबंदी केल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याचं पहायला मिळालं. तसेच कोरोनाच्या काळात देखील अनेक कंपन्या बंद पडल्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2014 ते 2020 या काळात 35 हजारपेक्षा उद्योजक देश सोडून बाहेर गेले आहेत. हा सगळा प्रकार त्यांच्या भीतीमुळे झाला असावा. एवढ्या मोठ्या संख्येने उद्योजक देशाबाहेर का गेले आहेत, याबाबत त्यांनी श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी अमित मित्रा यांनी केली आहे.

2014 ते 2017 या काळात 23 हजार उद्योजक देश सोडून निघून गेले. 2019 मध्ये 7 हजार तर 2020 मध्ये 5 हजार उद्योजकांनी देश सोडल्याचा दावा अमित मित्रा यांनी केला आहे. देश सोडून जाणारे सर्व उद्योजक अनिवासी भारतीय आहेत. या प्रकारे देश सोडून जाणे जगातील सर्वात मोठे निर्वासन आहे. त्यामुळे भारताला याचा फटका बसण्याची शक्यता देखील अमित मित्रा यांनी वर्तवली आहे.

दरम्यान, देशात 70 वर्षात जे काही काॅंग्रेसने कमवलं होतं, ते सर्व मोदी सरकारने विकलं आहे. देशातील रेल्वे, बंदरे, विमानतळ, पेट्रोलियमची पाईपलाईन्स, बीएसएनची विक्री केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी अलिकडेच केंद्र सरकारवर केला होता.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

अबब! 13 फुटी सापाला उचलण्यासाठी लागली जेसीबीची गरज; व्हिडीओ तुफान व्हायरल

पाकिस्तानचा कोच मॅथ्यू हेडन म्हणतो, भारताचे ‘हे’ दोन खेळाडू डोकेदुखी ठरणार

तारीख पे तारीख! टीईटीची परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलली; विद्यार्थी संभ्रमात

आर्यन खानला फक्त हिंदू-मुस्लीम वादासाठीच अटक केली – नाना पटोले

वर्ल्ड चॅम्पियन! डीजे ब्रावोच्या गाण्यावर थिरकले कॅरेबियन खेळाडू; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More