बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या प्रविण दरेकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात!

ठाणे | सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्यापासून राज्यातील वातावरण तापलं आहे. ओबीसी समाजाच्या हक्कांचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी भाजपकडून आज सकाळपासून चक्का जाम आंदोलन करण्यात आलं आहे.

मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर ज्ञानसाधना कॉलेजजवळ भाजपच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आलं होतं. परंतू काही वेळातच पोलिसांनी त्या ठिकाणी येऊन हे आंदोलन होऊ दिलं नाही. त्यावेळी पोलिसांनी भाजपचे विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांना ताब्यात घेतलं आहे.

प्रवीण दरेकर यांच्या व्यतिरीक्त आमदार निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांच्यासह सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच आज सकाळी ठीक 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली. त्याआधीच 9 वाजल्यापासून भाजप कार्यकर्ते आंदोलन स्थळी जमायला सुरुवात झाली होती.

दरम्यान, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरातून नेतृत्व करतील तर, रावसाहेब दानवे जालनातून आंदोलन करणार आहे. तर पंकजा मुंडे पुण्यातून आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोना लस न घेणं पडू शकतं महागात; धक्कादायक माहिती आली समोर

“अरे भाई हिप्पोक्रसी की भी सीमा होती है !!”

कोण राजे?, मी तर त्यांना राजे ही उपाधीही देत नाही- नारायण राणे

मोठी बातमी! अनिल देशमुखांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स

विमानतळ नामकरण आंदोलन भोवलं; नियमांचं उल्लंघन केल्यामुळे 20 हजार आंदोलकांवर गुन्हे दाखल

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More