बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोना काळात कामासाठी फडणवीस आणि माझ्याइतकं कोणताच नेता फिरला नसेल”

पुणे | कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा फटका महाराष्ट्राला बसला. या लाटेत अनेकांना आपले जीव गमवावे लागले. काही तयारी नसल्यामुळे कोरोनाची रूग्णसंख्या वाढली आणि बेडची कमतरता, ऑक्सिजनचा पुरेसा साठा नाही, अशा समस्या निर्माण झाल्या. याच पार्श्वभूमीवर भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं.  पुण्यात प्रसारमध्यमांशी ते बोलत होेते.

कोरोनाच्या संकट काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माझ्याइतकं काम राज्यातील इतर कोणत्याच नेत्याने केलं नाही. आम्ही कोरोनाच्या काळात सतत फिरत आहोत. आमच्या दोघांइतकं कोणताच नेता फिरला नसेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी बोलताना पाटलांनी मराठा आरक्षण आणि लसीकरणाच्या ग्लोबल टेंडरवरही भाष्य केलं.

केंद्र सरकारने परदेशी लसींना अद्याप परवानगी न दिल्याने महाराष्ट्र सरकारची लस खरेदी रखडल्याचे अजित पवार म्हणतात. पण मग मुळात लसींना परवानगी नसताना त्यांनी ग्लोबल टेंडर हा शब्द उच्चारलाच कसा?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मुंबई महानगरपालिकेप्रमाणे पुणे पालिकेला ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून लस खरेदीसाठी परवानगी दिली जात नसल्याच्या भाजपच्या आरोपात तथ्य असल्याचं पाटील म्हणाले.

दरम्यान,  नागपुरातील काही मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांना भाजप रसद पुरवत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता. यावर, सचिन सावंत यांनी प्रथम त्याचे पुरावे सादर करावेत, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

काँग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा खालावली

कोरोनाला हरवणारी देशातील सर्वात लहान कोरोना वॉरियर बनली ही चिमुकली, पाहा व्हिडीओ

‘गंगा नदीत तरंगणारे मृतदेह हे….’; कंगणा राणावतचा जावईशोध

‘आम्ही दोघं बाजारात गेलो, तेव्हा…’; आई-वडिल घरात नसताना अल्पवयीन मुलीवर दोनदा बलात्कार

‘इथं दिसना, तिथं दिसना’; कोविड सेंटर पेशंट मुक्त झाल्यानं कर्मचारी मनसोक्त नाचला

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More