बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना काळात शेतकरी बांधव राबला म्हणून इतर जगू शकले- विजय वडेट्टीवार

चंद्रपूर | देशभरातील अनेक कोरोना योद्धे गेल्या वर्षभरापासून कोरोनापासून आपल्याला वाचवण्यासाठी लढत आहेत. तसेच अनेक डॉक्टर्स, नर्सेस यांनी या लढाईत आपले प्राण गमावले आहेत. अशातच कोरोना काळात शेतकरी बांधव राबला म्हणून इतर जगू शकले, असं राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार यांनी म्हटलंय.

ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा येथे शेताच्या बांधावर आयोजित ‘शेतकरी संवाद’ या कार्यक्रमात ते बोलत होते. संपूर्ण जगावर तसेच देशावर आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे जनजीवन थांबलं. त्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसला. मात्र या संकटातही केवळ कृषी क्षेत्रामुळे आपण तग धरु शकलो. कोरोना काळात शेतकरी बांधव राबला म्हणून इतर जगू शकले, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करण्यासाठी सलग दोन वर्षात 28 कोटी रुपयांची यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली आहे. भविष्यात मजूरांची कमतरता जाणवणार असल्यामुळे शेतकऱ्यांनीसुद्धा नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणं गरजेचं आहे, असंही पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं

दरम्यान, कृषी विभागाच्यावतीनं बेटाळा येथील नरेंद्र ढोंगे यांच्या शेतावर सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जि. प. सदस्य स्मिता पारधी, राजेश कांबळे, न. प. सभापती विलास विखार, जिल्हा अधिक्षक कृषी भाऊसाहेब ब-हाटे, तहसीलदार विजय पवार, उपविभागीय कृषी अधिकारी आर. टी. जाधव, तालुका कृषी अधिकारी पी. डी. खंडाळे उरस्थित होते.

थोडक्यात बातम्या – 

दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणत घट, वाचा आजची आकडेवारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पहाटे देशाला संबोधित करणार!

चिंताजनक! देशातल्या ‘या’ राज्यात आढळला ग्रीन फंगसचा पहिला रुग्ण

“सोनिया गांधींनी शब्द दिलाय, काँग्रेस शिवसेनेसोबत पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करेल”

ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल न मिळाल्याने विद्यार्थीनीनं उचललं धक्कादायक पाऊल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More