बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुला लईचं कळतं रं, आमच्या बारामतीत मी बोलायला लागलो की…”

अहमदनगर | नेहमी शांतपणे परिस्थित हाताळणारे अजित पवार अहमदनगर येथील कार्यक्रमात मात्र उपस्थित प्रेक्षकांवरच भडकल्याचे पहायला मिळाले. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या भाषणादरम्यान प्रेक्षकांमधून गोंधळ सुरु झाल्याने कार्यक्रमाला उपस्थित अजित पवारांनी प्रेक्षकांना चांगलंच खडसावलं आहे.

रोहित पवारांच्या मतदारसंघातील विकासकामांच्या भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी रोहित पवार भाषण करण्यासाठी गेले असता प्रेक्षकांमधील काहीजण रोहित पवारांना मागण्या व सूचना करू लागले. यावेळी अजित पवारांनी बराच वेळ संयम दाखवला. परंतु बराच वेळ सुचना सुरुच राहिल्याने शेवटी पवारांनी संतप्त होऊन त्या गटाला चांगलंच सुनावलं.

प्रेक्षकांना खडसावताना अजित पवार म्हणाले, “तुला लईचं कळतंय. ये इथं येऊन भाषण कर. आमच्या बारामतीत मी बोलायला लागलो, की सगळे चिडीचूप असतात. येथे उगाच रोहितला त्रास होईल म्हणून ऐकून घेतोय. नाही तर हिसका दाखवला असता.”, अशा शब्दात त्यांनी त्या प्रेक्षकांना खडसावलं आहे.

याशिवाय अजित पवार पुढे म्हणाले, आम्ही काय असेच उठून आलेलो नाही. सात वेळा दीड दीड लाख मते घेऊन निवडून आलेलो आहोत. आमच्या बारामतीत कोणी असं मध्ये बोलतं नाही. इथे मध्ये बोलायची सवय आहे. ऐकून घेतोय तर मध्येच बोलत आहेत, असे खडे बोल पवारांनी गोंधळ घालणाऱ्या प्रेक्षकांना सुनावले.

थोडक्यात बातम्या-

कंगना राणावतच्या अडचणीत वाढ; काँग्रेसने केली पोलिसांकडे तक्रार

“मी पण एसटी कामगाराचा मुलगा असल्याने मला…”

“शरद पवार आणि उद्धव ठाकरे वेगवेगळे नसून ते एकच आहेत”

रझा अकादमीवर बंदी घाला, अन्यथा…- नितेश राणे

“नोटबंदीमुळे आपण कॅशलेस होण्याऐवजी लेसकॅश झालो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More