Top News देश

देशातील शेतकरी आंदोलनादरम्यान केरळ सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली | देशात सध्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन चालू ठेवलं आहे. शेतकऱ्यांनी आज म्हणजे 8 डिसेंबरला देशात भारत बंदची हाक दिली आहे. मात्र अशातच केरळ सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

केरळमधल्या पिनराई विजयन सरकारनं आपल्या राज्यात हे कायदे लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे. या कृषी कायद्याविरोधात ते न्यायालयात दाद मागणार असल्याचं केरळ राज्याचे कृषीमंत्री व्ही. एस. सुनीलकुमार यांनी सांगितलं आहे.

या आठवड्यात आम्ही  सर्वोच्च न्यायालयात केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात याचिका दाखल करणार आहोत. केरळमध्ये हे कृषी कायदे लागू होऊ देणार नाही. तसंच पर्यायी कायद्यांवर विचार विनिमय केला जाईल, असं व्ही. एस. सुनीलकुमार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शेतकरी आंदोलनाला देसभरातून पाठींबा मिळत आहे. यामध्ये मोठमोठे सिनेतारका, उद्योजक यांचाही समावेश आहे. आजच्या भारत बंदच्या हाकेला भारतीयांनी चांगल्याप्रकारे प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

‘शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणं जगातील प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य’; राऊतांचं नागरिकांना आवाहन

‘माझ्या बापाला माझा पाठींबा असणारच!’; अभिनेता हेमंत ढोमेचा शेतकरी आंदोलनाला पाठींब

“शेतकऱ्यांचा नावाखाली राजकारण करणाऱ्यांचा आजचा बंद आहे पण… “

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमीच- राजेश टोपे

डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येनंतर आमटे कुटुंबावर ओढावलं आणखी एक संकट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या