बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धकानं मान मोडली, पैलवानाचा रिंगणातच मृत्यू

नवी दिल्ली | ठाकूरद्वारातील फरीदनगर गावात झालेल्या कुस्ती स्पर्धेदरम्यान धक्कादायक प्रकार घडला आहे. सामन्यादरम्यान कुस्तीपटूची प्रतिस्पर्धकानं मान मोडल्यानं या पैलवानाचा जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती आहे.

मुरादाबादच्या ठाकूरद्वारातील फरीदनगरमध्ये दंगल आयोजित करण्यात आली होती. यामध्ये काशीपूर, उत्तराखंड येथील कुस्तीपटू महेश कुमार देखील सहभागी होण्यासाठी आलेला. या दरम्यान महेशचा फरीदनगरचा पैलवान साजिद अन्सारीसोबत कुस्ती सामना झाला.

कुस्तीदरम्यान साजिदने महेशला उचलले आणि खाली आदळले तेव्हा महेश मानेवर आदळला. यामुळे महेशची मान तुटली. तो जमिनीवर कोसळला आणि तडफडू लागला. महेशचा रिंगणातच मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे.

महेशला उचललं तेव्हा त्याची मान एका बाजूला लटकलेली होती. हे पाहून सर्वांनाच धक्का बसला. कोणीही त्याला उपचारासाठी रुग्णालयातही घेऊन गेलं नाही.  धक्कादायक बाब म्हणजे गावकऱ्यांच्या मते, नौमी मेळ्यात परवानगीशिवाय रिंगण सजवण्यात आलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कलम 144 लागू, प्रशासनाचे जमावबंदीचे आदेश

ईडी कोर्टाने नोंदवलेल्या ‘या’ निरीक्षणामुळे एकनाथ खडसेंचं टेंशन वाढलं!

“ब्राह्मणांचा कायमच वापर झाला, शिवाजी महाराज सुद्धा ब्राह्मणच होते”

‘…अन् 100 प्रवाशांनी भरलेली बोट क्षणात आडवी झाली’; पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ

माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहे – धनंजय मुंडे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More